You are currently viewing कोलगाव श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 21 नोव्हेंबरला

कोलगाव श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 21 नोव्हेंबरला

सावंतवाडी

कोलगाव येथिल ग्रामदैवत श्री सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 21 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.

या निमित्त फुलांची सजावट, आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी सातेरी देवतांची पुजा त्यानंतर श्री सातेरीची आर्कषक स्वरूपात पुष्पपूजा दुपारी मानाचे नैवेद्य तसेच सकाळ पासुन ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्रो 12 वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिराभोवती पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. व रात्री 1 वाजता पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ वेगुर्ला याचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सातेरी देवस्थान स्थानिक सल्लागार कमिटीच्या वतीने चंदन धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा