You are currently viewing तिळगुळ घ्या गोड बोला
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

तिळगुळ घ्या गोड बोला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या सावित्रीची लेक, नेशन बिल्डर, आदर्श शिक्षिका पुरस्कारित लेखिका कवयित्री सौ सुजाता पुरी यांचा मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लिहिलेला लेख.*

*तिळगुळ घ्या गोड बोला*…

या वर्षीचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आज आहे.म्हणूनच सर्वांना या सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा…
असे म्हणतात की त्याचं त्याच वातावरणात उल्हास निर्माण करतात ते सण असतात…आपणही गेल्या दोन वर्षंपासून एका अनामिक भीती आणि अनिश्चिततेच्या सावटाखाली आहोत. नवीन वर्ष जरी सुरू असले तरी त्याचे सावट अजूनही आहेच परंतु मानवी प्रवृत्ती ही मुळातच उत्साही आणि आनंदी असल्याने येणारा हा सण आपल्यासाठी निश्चितच आनंदाचा ठरणार आहे.. या सणाचे महत्त्व म्हणजे या सणाला तिळगुळ वाटतात आणि गोड बोला असं एकमेकांना म्हणतात.. निदान या निमित्ताने का होईना माणसं एकमेकाशी दोन शब्द का होईना पण गोड बोलतात हेही नसे थोडके…
गोड बोलण्याचे खूप प्रकार आहेत,म्हणजे त्यावर एक संशोधन निबंध तयार होईल असे म्हणा..फक्त ते आपल्याला कळायला हवं इतकंच…
कामापुरती गोड बोलणारी माणसं असतात तशी गोड बोलून काम करवून घेणारी ही माणस असतात…
जिभेवर साखर ठेवून संकटात टाकणारी माणस ही असतात बर का….चुकीला चूक न म्हणता गोल गोल फिरणारी माणस ही गोड च बोलत असतात…अबब किती हे गोड बोलण्याचे प्रकार…मग तिळगुळ देताना नेमके कोणत्या पद्धतीचं गोड बोलायचं असतं असा प्रश्न पडतो…
संत तुकाराम महाराजांनी असे म्हटले होते की, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे…
कुणाचे कौतुक असो,शाबासकी असो किंवा आनंदाचा आणि दुःखाचा कोणताही प्रसंग असो यामध्ये साथ निभाना रे फक्त आपले शब्दच असतात…
माणसं पारखंन ही जशी एक कला आहे तशीच गोड बोलणारी माणसं कोणत्या भावनेने गोड बोलतात हे कळने सुद्धा एक कलाआहे.
शब्द घाव भरतात आणि शब्द घाव सुध्धा घालतात ..म्हणजे शब्द हे शस्त्र आपण कसे वापरतो यावर अवलंबून आहे….
गोड बोलणारी माणस सगळ्यांनाच आवडतात….कडू गोळी कधीच कुणाला आवडत नाही पण गुण येण्या साठी तीच तर महत्वाची असते….पण हे लवकर कळत नाही….
अशा गोड बोलण्याचा काय फायदा ज्या मुळे हृदयातल्या जखमा पुन्हा रक्ताळल्या..
*बोलतोस तु मधाळ केवढा परंतु काळजात तुझ्या गाळ केव्हढा*

मनात एक भावना ठेवून वर वर गोड बोलणारी माणस ही आपल्या जखमेवर मीठ चोळण्याचा च प्रकार करत असतात…त्या पेक्षा स्पष्ट शब्दात बोलणारी, कटू शब्द वापरणारी व्यक्ती नक्कीच चांगली असते..
ओठात एक आणि पोटात एक अशा दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेल्या माणसांचा फायदा होण्याऐवजी आपल्याला तोटाच होत असतो..
म्हणूनच गोड बोलणारी माणसे कोणत्या हेतूने बोलत आहेत हे लक्षात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे… त्यांचा कार्यभाग साधून घेण्याकरता त्यांनी घेतलेला हा बुरखा असतो असेच म्हणावे लागेल.
स्वच्छ मनाने आणि प्रामाणिक भावनेने बोलले गेलेले गोड शब्द दुःखात असणाऱ्या माणसाला जगण्याची प्रेरणा देतात ऊर्जा देतात आणि जगण्याची नवसंजीवनी देतात..
जीवनाचा प्रवास खूप छोटा आहे त्यातही कोणाचा प्रवास कधी संपेल याची पुसटशीही कल्पना कोणी कोणाला देऊ शकत नाही..म्हणूनच जीवनाच्या प्रवासात साथ देत असतात ते शब्दच असतात स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की सगळं स्पष्ट होतं तसच बोलणाऱ्या त्याच्या भावना शुद्ध असतील तर गोड शब्द अमृतात रूपांतरित होतात.. परंतु फक्त धोका देण्यासाठी बोलले गेलेले गोड शब्द हे एक प्रकारचे पापच आहे असे म्हणतात की *नियती नावाचे नियती नावाचे एक न्यायालय आहे, जिथे छक्केपंजे चालत नाहीत की तारखा मागे-पुढे करता येत नाहीत, जबाब फिरवता येत नाहीत. ज्या हातांनी केल्या जातं फेडावही त्याच हातांना लागतं*
म्हणूनच गोड बोलून दुसऱ्याला फसवणार यांनी नियती चा न्याय उशिरा का होईना पण होत असतो याचे भान जरुरी ठेवावे..
*विस्तवासही नसेल कल्पना, शब्द लावतात जाळ केवढा*
समोरच्या माणसाने आपला अपमान होईल असे शब्द वापरले की विस्तव लावत नाही तेवढी आग हृदयात लागते.
*अपने जखम किसीको दिखाया ना करो, लोग मुठी मे नमक लिये घुमते है*

आपली दुखे आपल्या वेदना आपण सांगत असताना गोड बोलून आई किनारी माणसे मात्र आपल्या खोट्या वागण्याने त्यावर मीठच सोडत असतात तर काही विकारी शब्दांनी वार करत असतात..
गोड बोलणे होऊन निघालेला आपला विषय तिखट बोलण्यावर कधी आला हेही समजले नाही… अति सर्वत्र वर्जते… या म्हणी प्रमाणे आपणही चांगल्या आणि प्रामाणिक भावनेने आणि स्वच्छ हेतूने नेहमी समतोल शब्द वापरले तर प्रश्नच उद्भवणार नाही…
म्हणूनच या संक्रांतीला विचारांचा संक्रमण करूयात मनापासून स्वच्छ भावनेने निर्मळ मनाने एकमेकांशी सर्व हेवेदावे विसरून गो ड बोलूयात सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा