You are currently viewing सुखाचा पासवर्ड
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

सुखाचा पासवर्ड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

*सुखाचा पासवर्ड*
——————————
नेहमी प्रमाणे रविवारच्या सुटीनंतरची बँकेत गर्दी.।मॅडम गर्दी कंट्रोल करा । माझ्या वरिष्ठांची सूचना . येस सर , नरेश ग्राहकांना व्यवस्थित रांगेत यायला सांग . आपला परीसर लहान असल्याने दहा/दहा च्या संख्येने दरवाज्याच्या आत घे. बाकींना बाहेरच रांगेत राहायला सांग . मी कॅशियर केबिनमध्ये डोकावत कॅशियर अशोकला सांगितले ” मिलिंदला पाठवू का मदतीला ” ” पाठवा मॅडम ” आणि छोट्या डिपाॅझीट बँक ग्राहक मित्र केंद्रावर वर्ग करा ”  होय , काही ग्राहक कॅश डिपाॅझीट मशिनचीही मदत घेत आहे .”

” मॅडम एक तास झाला कॅश डिपाॅझीट करून , अजून अकोल्याला पार्टीच्या खात्यात जमा झाले नाही ” ” कनेक्टीव्हीटी नाही आहे ” ” कनेक्टीव्हीटी नाही किती सहजतेने म्हणतात हो तुम्ही .तिकडे पेशंट तळमळतोय .आॅपरेशन करायचंय . पैसे जमा झाल्याशिवाय होणार नाही ” ” मी आमच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क केला .संपूर्ण सर्व्हर डाऊन होता . प्रधान कार्यालयाशीही संपर्क झाला . तासभर तरी लागणार होता .” सर , तासाभराने कनेक्टीव्हिटी येईल ” ” एक तास ? मॅडम जीवन मरणाचा प्रश्न आहे . एका एका सेकंदाचा हिशोब आहे आणि तुम्ही एक तास म्हणतात?.काय होईल पेशंटची हालत , काही माणुसकी आहे कि नाही तुमच्याजवळ ?” ” शांत व्हा सर , मी त्यांना पिण्यास पाणी दिलं . मी करते काहीतरी ” मी अकोला शाखेला फोन केला . शाखा व्यवस्थापकांना सगळी परिस्थिती सांगितली, ग्राहकांची एमरजन्सी सांगून माझ्या रिस्कवर पैसे द्यायला सांगितले . त्यांनी माझं नाव GBPA नंबर घेतला . व ग्राहकाला पैसे दिले . माझ्या समोर बसलेले ग्राहक मोहन वैद्य शांत झाले . ” धन्यवाद मॅडम , आम्ही अगतिक होतो , म्हणून बोललो मी . माफ करा ” ” ठीक आहे , तुमचं काम झालं ना , आनंद आहे मला “मोहन वैद्य गेले तशी मी थोडंसं हुश्श् केलं .माझी सहकारी प्रणिता सगळं पाहात होती .

सुनीता कनेक्टीव्हीटी नसणे यात आमचा काय दोष.येतात काही तांत्रिक अडचणी . ग्राहकसेवा काही वेळापुरती खंडित होते मान्य . पण त्यात आमची चूक नाही ना .आम्ही काही हातावर हात धरुन बसत नाही .follow up सुरूच असतो . तो ग्राहक इतकं बोलत होता , तरी तू शांत राहिलीस . कसं शक्य होतं तुला हे ”
प्रणिता येतातच असे समर प्रसंग .ATM चालू नाही .बोलवा टेक्निशियन , त्यांना ताबडतोब येता येत नाही , कारण अनेक ठिकाणची कामं . ग्राहक ऐकत नाही .त्यांना ताबडतोब सुविधा हवी . ही तर काही उदाहरणं झाली . प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ग्राहक त्रास देतातच . पण मी ते दुर्लक्षित करुन त्यांचं काम करुन देते ”
” अग तेच तर म्हणतेय मी . तू इतकी मवाळ कशी ? तुला त्रास नाही होत या गोष्टींचा .
खरं सांगू प्रणिता स्वतःला त्रास होऊ नये हाच माझा उद्देश असतो . कारण तू तू मी मी करण्यात मनःशांती जाते . आपलंच बी. पी . वाढतं. मन अस्वस्थ होतं . बरं एवढंच नाही आपल्याला घरही सांभाळायचं आहे . कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे . मग अशा गोष्टीत का शक्ती खर्च करायची .
प्रणिता माझ्या कृतीने भलं होत असेल , चांगली सेवा मिळत असेल , पण यातून मला समाधान मिळतं , शांती मिळते , मी सुखी होते . ” भलेही हा माझा सुखाचा पासवर्ड असेल ”
माझ्यापुढे दोन्ही हात जोडत प्रणिता बोलली . ” धन्य आहेस ग बाई “.

प्रणिताने विषय छेडला आणि मी हळूहळू शिरले भूतकाळात.
” ए छकुली ऊठ गं , शाळेत जायचंय ना ”
मी अंथरूणात हातपाय हलवत , आज नाही जात शाळेत सांगितलं . ” अग , न जाऊन कसं चालेल.चांगलं शिक्षण घेशील तर जीवनात काही चांगलं करून दाखवशील .स्वतःच्या पायावर उभी राहशील . ज्ञानाने तुझ्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल .जगात जो ज्ञानी तो मोठा गणला जातो . तुला मोठं बनायचं आहे ना .मग तुला शिकायला हवं . शाळेत जायला हवं .ऊठ बाळ , तुझ्या सुखी जीवनासाठीचा हा पासवर्ढ समज आणि शाळेला जा . शाळेतही माझा पहिला नंबर कधी चुकला नाही याचे कारण मी वेळच्यावेळी अभ्यास करायचे , गृहपाठ करायचे , इतर माझ्या वर्गमैत्रिणी मात्र तहान लागली की विहीर खोदायची या तत्वाने परीक्षा आली कि अभ्यासाला लागायच्या . सुनीता तुझ्या यशाचं रहस्य काय गं ”
” अगदी सोपं आहे , वेळच्यावेळी अभ्यास , हाच माझा सुखाचा पासवर्ड , मग ऐनवेळी माझी धावपळ होत नाही कि  रात्र /रात्र जागरणं करावी लागत नाही कि कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही .अगदी बिनधास्त असते . ” आम्हांलाही आत्मसात करावा लागेल ग हा सुखाचा पासवर्ड ”

अशी मी पुस्तकांशी मैत्री असलेली , अगदी टिपीकल भाषेत ” पुस्तकी किडा “. कोणी काहीही म्हणू दे , मी तर सुखी आहे ना .

माझ्याही आयुष्यात तो दिवस आला , ज्या घरात मी जन्मले , लहानाची मोठी झाले , त्याच घराची मी पाहुणी होणार होते , माझं घर आता माहेरात परिवर्तित होणार होतं .मी खूप हळवी झाले होते .
” जगाची रितच आहे पोरी ही . एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला आई बाबांचं घर सोडावं लागतं कारण सासरी हे रोपटं रूजणार असतं ,फुलणार असतं .ही जगरहाटी टाळून कसं चालेल ”
“पण आई , संपूर्ण वेगळं कुटुंब , वेगळी माणसं , वेगवेगळ्या स्वभावाची माणसं,वेगळं वातावरण ,कशी सामावली जाणार मी त्यांच्यात , कशी रूजणार नात्यांच्या विविध बंधनात .”
“होय बेटा , बंधनं तर भरपूर आहेत .सासू सासर्‍यांचा सन्मान , नणंदेचा तोरा ,जावा जावातील हेवेदावे .पण बाळा चिडायचं नाही . शांत राहायचं , वेळप्रसंगी कुटुंबाच्या सुखापुढे आपल्या इच्छांना मुरडही घालावी लागते ,आणि यातच गृहिणीधर्म असतो . ” पण आई , यासाठी काय मी माझी सगळी ओळखचं मिटवायची काय ? आणि माझ्या ज्ञानाचं काय ? तूच म्हणत होतीस ना ज्ञानाने माणूस मोठा होतो .आता हे ज्ञान असंच जाऊ द्यायचं , तुझ्यासारखं स्वयंपाक घरातच राहायचं . ” नाही ग बाई , तुझं म्हणणं तू तुझ्या कुटुंबाला समजावून सांगू शकतेस . तुझा होणारा जीवनसाथी ही सुशिक्षित आहे . त्याला पटेल तुझं म्हणणं कि भरारी घेणारी पक्षीण घरटं मात्र विसरत नाही . तुझ्या कला गुणांचा , तुझ्या शिक्षणाचा आदरच होईल . फक्त ते व्यवस्थित सांगता आलं पाहिजे . काही समस्या असल्यास त्यातून मार्ग काढता आला पाहिजे .हे जमलं कि सुखाचा पासवर्ड गवसला समज.

आज मी एक यशस्वी बँक अधिकारी होते , दोन मुलांची आदर्श माता होते , सासू सासर्‍यांची मी जणू  मुलगी होते आणि अरविंदची जीवलग सहचारिणी होते . हे सगळं मी जमवू शकले सुखाच्या पासवर्डने , तो कोठे , कसा वापरायच्या हे आईने दिलेल्या सखोल ज्ञानाने .

ये सुनीता तू एवढी सुखी कशी गं . आम्हांलाही दे ना काही टिप्स . पण तू सुखी आहेस कारण तू स्वावलंबी आहेस .मी पण तुझ्यासारखं शिक्षण घेतलं असतं तर कोठे ना कोठे नोकरी मिळाली असती . पण नशिबातचं नव्हतं गं माझ्या . ” ” रमा पहिल्यांदा तू ही रडकथा थांबव. शिक्षण नाही म्हणून तू काही करू शकणार नाहीस असं नाही .” ” मुलांचे शिकवणी वर्ग चालव . तुझ्या पुढच्या हाॅलमध्येच तुला घेता येतील . तू चांगली सुगरण आहेस , काॅलेजच्या मुलांचे डबे करू शकतेस . स्वावलंबी व्हायला अनेक मार्ग आहेत गं . पण ते शोधायला हवे .आणि सर्वात महत्वाचं सुख हे मानण्यात असतं .अति महत्वाकांक्षा , अति लोभ , अति अपेक्षा केव्हाही घातकच , कारण त्यांना कोठे अंतच नसतो . म्हणूनच कोठे थांबायचं हे ठरवता आलं पाहिजे .मग सुखाचा धागा आपसूकच हाती येतो .

माझ्या फोनची रिंग वाजली , कामगार कल्याण मंडळातून फोन होता . मॅडम , परवा दहावी बारावीतील उत्तीर्ण कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे . आपण प्रमुख पाहुणे म्हणून तर यावेच पण मुलांना काही प्रेरक मार्गदर्शनही करावे . आपण येणार ना मॅडम .” होय सर , मी येईन ” ” ठीक आहे मॅडम , मी whats app वर निमंत्रण पाठवलेच आहे . सायंकाळपर्यंत hard copy ही मिळून जाईल.

दहावीनंतर काय ? बारावी नंतर काय ? विविध शैक्षणिक मार्गदर्शनानंतर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करावे याकडे मी वळले .
मुलांनो जीवनवाट सोपी नाही . आयुष्यात अनेक समर प्रसंग येतात .सगळं संपल वाटायला लागतं . चोहीकडे अंधारच वाटतो . पण प्रकाशकिरण आम्हांलाच शोधायचा असतो . त्यातूनच वाट शोधत मार्गक्रमणा करावी लागते . बाळांनो मी आज काही सुखाचे पासवर्ड देणार आहे . आता तुम्ही म्हणाल सुखाचा पासवर्ड म्हणजे काय ? तर जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टी कोनातून पाहाणे .ही सकारात्मकताच तुम्हांला नवऊर्जा देते , प्रेरणा देते . ती कशी पाहुयात .
1) कोणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा.
2) स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा.
3) खोटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा
4) तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा
5) विनाकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा
6) उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा
7) तुमच्या जीवनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.
बाळांनो हा सुखाचा कानमंत्रच माणसाला यशस्वी करतो . मी फार काय सांगणार ?, तुम्ही सुजाण आहात , देशाचे होणारे आधारस्तंभ आहात , देशाची भावी पिढी आहात.
यशस्वी व्हा .All the best .

” मॅडम खूपच छान , मार्गदर्शन तर मुलांसाठी होतं . पण आम्हांलाही त्यातून खूप काही मिळालं. मान गए भाई आपको .” कामगार कल्याण अधिकारी प्रशांत कदम चहा बिस्कीटांचा आस्वाद घेता घेता बोलत होते . ” मी फार काय सांगितलं असं नाही प्रशांतजी , प्रत्येकातच हे गुण असतात ” ” असतात ना मॅडम , पण त्यांचा परिचय , त्यांची ओळख हवीच ना , शिवाय त्यावर अंमलही करता यायला हवा .सगळ्यांना तो जमेलच असं नाही .”
” सुधीर आपलं अभिप्राय नोटबुक आणा. मॅडम अभिप्राय लिहितील आणि मानधनाचं पाकिटही आणा”
एक अनामिक समाधान घेऊन मी कामगार कल्याण मंडळातून बाहेर पडले .
————————————————————
सुश्री . शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 6 =