You are currently viewing धुंदी

धुंदी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम कथा*

*धुंदी*

पुन्हा ही कुठली धुंदी चढायला लागली आहे तिला? रोजचं रुटीन तेच आहे. सकाळी पाचच्या अलार्मला उठायचं. मुलांना उठवायच्या आधी स्वतःच आवरून किचनच्या ओट्याकडे धाव घ्यायची. भरभर हात हलवत राहायचं, डोकं भन्नाट स्पीडनं कामं मागं टाकत जातं जेव्हा टाईम बाउंड काम करते ती. काहीही कमी जास्त असू दे दुसऱ्या क्षणाला त्यावर मात केलेली असते तिने.

“ओ वुमनिया, आहा वुमनिया…”
पाठीमागे एफएम च्या कुठल्या तरी चॅनलनं आपला आवाज टिपेला चढवलेला असतो. त्याचसरशी ओले हात पुसून ती पटकन हळुवार बटन दाबून त्याचा आवाज संथ करते. ती डबे वेळेवर भरत असते. मुलांचे दुधाचे ग्लास, बाकीच्यांचे चहा ज्यूस जे असेल ते सगळे वेळेवर होत असतं. स्वतःचा डबा घेऊन नऊला तर घर आवरून स्वतःला आरशात ओझरतं बघून तिनं घर सोडलेलं असतं. सगळं कसं टाईम टू टाईम. शनिवार रविवार मात्र ती थकून जायची. आणि का नाही होणार असं? आठवड्याभराचा ताण घालवायला सगळ्यांना सुट्टी असते पण तिला तर उलट पुढच्या आठवड्याची जादाची काम सुद्धा उरकायला वेळ कमी पडायचा, मग विश्रांती तर दूरच.

चिडचिड व्हायची तिची पण त्रस्त नव्हती ती. मुलाबाळांचं, नवऱ्याचं, घराचं करता करता तारांबळ होत होती पण एक कृतार्थतेची जाणीवही सुखावून जायची. आणि इतका विचार करायला या व्यस्त आयुष्यातून दोन घडीची तरी सुटका होती कुठे तिच्या वाट्याला? दिवस, महिने, वर्ष असेच भरकन उडून चालले होते.

“आज कल पाव जमीं पर नही पडते मेरे बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए…”

घरी आल्यावर तिच पहिला आवडतं काम म्हणजे एफएम चालू करून मूड फ्रेश झाल्यावरच स्वतः फ्रेश व्हायला जायचं. साडी बदलता बदलताच ती आरशात स्वतःला पाहत होती आणि हे लताच्या आवाजातलं गाणं. ती तशीच बसली. तिच आवडत गाणं. आज काल आपण जास्तच आरशात बघतोय का? केसही पुन्हा पुन्हा ठीक ठाक करतोय. आपण जास्तच फ्रेश राहायला लागलोय का? सारख हासत का असते मी? वरचेवर साडी नेसते का मी आजकाल? हे काय चाललंय… आता या वयात पुन्हा? त्याच्या फोनची तर वाट नाही बघत न? माझा नंबर कसा काय मिळाला त्याला? हा विचार तर आपण केलाच नाही.
आणि इतक्या वर्षांनी त्याच्याशी फोनवर बोलताना आपली उडालेली धांदल कळली असेल का त्याला? आता हा नवाच छंद जडला होता. पाहिजे तेव्हा आठवणींच्या राज्यात जायचं. मिळतील तितक्या आठवणींच्या पाकळ्या गोळा करत करत पुढे जायचं आणि त्याचा मनसोक्तपणे सुगंध लुटत पुन्हा धावत येऊन आपल्या रोजच्या रूटीनमधे परतायचं. त्या आठवांच्या बंद दाराआड आपण काय करतोय हे कोणाला म्हणजे कोणालाही कळत नाही. किती छान आहे ना हे माझे गुपित? पण तिच तिला कळायचा ना, हा वेडेपणा. हो वेडेपणाच की. आता सगळं सुरळीत चालू असताना काय गरज आहे त्या जुन्या गोष्टींची ज्यांना तिनं आणि त्यांनही मिळूनच पूर्णविराम दिलेला होता. आयुष्य तसं व्यवस्थित चालू होतं दोघांचाही. मग आता चाळीशीच्या उंबरठ्यावर हा नव्याने येऊ पाहत असलेला उन्माद योग्य होता का नव्हता? बुद्धी, मन आणि देह या तिघांच्या कात्रित तिची कोंडी होत होती. तिला कळत नव्हतं की त्याच्याबरोबर पुन्हा बोलायला, त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांची उजळणी करायला मन इतकं का उत्सुक होतं ते? एवढे दिवस तर आठवणींनी स्वतःला कुठल्यातरी सुप्तावस्थेत गाडून घेतलं होतं. अशातच त्याचा फोनवर आवाज ऐकला आणि जणू काही निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा आणि तो सर्व शक्तीनिशी उसळी मारून वर यावा तसं का होतंय? त्याचं ते आर्जवी बोलणं, मागं घेतलेल्या शपथा,वचनं… का तो परत मला वेड लावतो आहे?आपण विसरून जायच ठरवलं होतं ना रे? मग पुन्हा नको ना ओढू मला तुझ्यात.

एकीकडे असं वाटतंय तर दुसरं मन म्हणतय जाऊया, एकदा तर भेटायला बोलवतोय. इतका काय भाव खायचा? तू काय स्वर्गातली अप्सरा नाहीस की कॅटरिना, मलायका नाहीस. एक साधी सर्वसामान्य स्त्री तर आहेस, तरी तुझ्या वाट्याला इतकं सुंदर निर्लेप प्रेम येतय त्याचा अव्हेर का करतेस? शेवटी व्हायचं तेच झालं त्याच्या आर्तपणे घातलेल्या सादेला प्रतिसाद देणं ओघांनच आलं. तिच्या अंतर्मनात चाललेल्या या द्वंद्वामध्ये हृदयांनं बुद्धीला मात दिली. शेवटी एकदाच तिने ठरवलं त्याला भेटायला जायचं. हो आज तो दिवस आला जेव्हा ती ऑफिसला जायला घरातून बाहेर तर पडणार होती पण भेटणार होती त्याला.

“तुम आ गये हो नूर आ गया है
नही तो चरागोंसे लौ जा रही थी….”
किशोर लताच पुन्हा तेच किलर कॉम्बिनेशन. तिच्या देहातला अणू रेणू चैतन्यमय होऊन गात नाचत होता. त्याच्या आवडत्या रंगाची साडी, मोठ्या जरी बुट्यांचा ब्लाऊज, मॅचिंग बांगड्या झुमके… एकीकडे तिची गाणं ऐकता एकता आवराआवर चालली होती.
पर्स कुठली घ्यावी? नेहमीच घेऊ, उगाच कुणाला संशय नको.
कशी दिसते मी?
त्याला शेवटचे भेटून जवळ जवळ पंधरा-सोळा वर्ष होऊन गेली. तो कसा दिसत असेल?
तसाच असेल का अजूनही रुबाबदार स्मार्ट शिडशिडीत? गालावर पसरलेलं हलकं हसू… आणि केस? तसेच असतील का भरगच्चं?आपल्याला खूप आवडायचे तसे का विरळ झाले असतील?
आता पोटही सुटलं असेल नै? कसा दिसत असेल तो?
चष्मा लागला असेल पण.
इतक्या दिवसांनी त्याला भेटल्यावर आपण काय बोलणार त्याच्याशी?

“दिल… संभल जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू… “. एफ् एम् आपलं काम बजावत होता.
तिने पुन्हा पुन्हा आरशात पाहिलं स्वतःला ठीकठाक केलं.
काही राहिला नाही ना बघितलं. एकदम तिला जाणवलं अरे आपणही किती बदललो आहे. आधी इतकी बारीक कंबर होती आणि आता ….
असू दे. तिचा तिनंच विचार केला. आता दोन मुलांची आई काय कॉलेजमधलीच दिसेल का? मी काय संतूर ममा आहे तशी दिसायला? ते सगळं फक्त जाहिरातीपुरतं दिखाऊ असतं.
ठीक आहे
पण त्याला काय वाटेल तुला पाहून
तू अशी दिसत असशील याची त्यांन कल्पना तरी केली असेल का ?
का त्याच्या डोक्यात तू तीच कॉलेजमधलीच आहेस अजून?
या विचारांसारशी ती एकदम खालीच बसली. नवऱ्याच्या, मुलांच्या हातांचा प्रेमळ विळखा तिच्या कमरे भोवती जाणवू लागला. मी जशी आहे तशी माझ्या घरच्यांना तर छान वाटते आवडते पण तो? त्याला पूर्वीप्रमाणेच पूर्वीसारखीच मी हवे असेल तर ?
मग आता मला पाहून त्याच प्रेम कदाचित आटून जाईल.
तो आपल्याकडे दुर्लक्ष सुद्धा करू शकेल. काय सांगता येत या पुरुषांचं. आपण ज्या ओढीन त्याला भेटायला जातोय ती ओढच संपून जाईल कदाचित. ज्या हळुवारपणे आठवणींचे धागे रेशमाच्या दुलयीला जपावं तसे आपण जपले ते क्षणात तुटून गेले तर ?
त्यापेक्षा…. त्यापेक्षा…

तिनं मन घट्ट केलं.
“आपण कधीही भेटू शकणार नाही” असा मेसेज टाईप करून त्याला पाठवला आणि तो नंबर ब्लॉक केला कायमसाठी. आज ती ऑफिसला ही गेली नाही. बेडवर अंग टाकून खूप वेळेपर्यंत स्फुंदत पडून राहिली.
तिची विचारशक्तीच संपली होती. आपण असा निर्णय का घेतला हे तिचं तिलाच कळत नव्हतं.
आपल्या सुंदर आठवणींना धक्का लागू नये म्हणून ?
त्याला भेटून आपण मोहाच्या पायरीवर पुढचं पाऊल टाकू शकू असा स्वतःचाच संशय आला म्हणून
का
नवऱ्याशी, घराशी, मुलांशी ती एक प्रकारची प्रतारणाच ठरेल म्हणून?

मग प्रतारणा काय फक्त शरीराची, शरीरानेच करण्याची गोष्ट आहे का? मनानं तर ती कधीच केली होती ना. कदाचित त्याच गोष्टीचं प्रायश्चित्त म्हणून तर हा निर्णय घेतला नसेल तिनं? अचानक तंद्रीतून ती जागी झाली, एफएम तिच्या आवडता एफएम…. चालूच होता…
‘दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन…’

अंजली दीक्षित-पंडित

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + nine =