गोल्ड इन्व्हेस्टमेंटच्या नावाने फसवणूक करणारे अक्षय सावंत आणि पल्लवी घाडगे दाम्पत्य फरार…..

गोल्ड इन्व्हेस्टमेंटच्या नावाने फसवणूक करणारे अक्षय सावंत आणि पल्लवी घाडगे दाम्पत्य फरार…..

माहिती देणाऱ्यास ५००००/- चे बक्षीस

मुंबईतून येऊन कनेडी हे मूळगाव असलेला अक्षय सावंत याने कणकवली व कुडाळ येथील लोकांना गोल्ड ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यातून भरपूर नफा मिळणार अशी आशा दाखवत आणि सुरुवातीस रीतसर कागदपत्रे बनवून काहींना सोन्याच्या गुंतवणुकीवर भरमसाट व्याज देखील दिले. परंतु एकदा विश्वास बसल्यावर अक्षय व पल्लवी या दाम्पत्याने रीतसर कागदपत्रे न करता गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळणार असे सांगून कुडाळ, कणकवलीतील अनेकांना लाखो रुपयांना फसविले आणि ८ऑक्टोबर पासून हे दाम्पत्य आपला मोबाईल फोन बंद करून फरार झाले.
अक्षय सावंत व पल्लवी घाडगे यांनी यापूर्वी कर्नाटक मध्येही बेंगलोर येथे देखील अशीच फसवणूक केली आहे, तिथे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होते. परंतु त्यांचा वकील हा कोणीतरी मोठा व्यक्ती असून भागवाभागवी करून त्याने ती प्रकाराने मिटवून टाकली आहेत. ज्याप्रकारे कर्नाटक आणि सिंधुदुर्गात लोकांकडून सोन्याच्या गुंतवणुकीवर भरमसाट फायदा मिळणार असे आमिष दाखवून लोकांना फसविले त्याचप्रमाणे इतर ठिकाणी देखील हे दाम्पत्य अशाचप्रकारे फसवणूक करू शकतात अशी शक्यता आहे.
फसवणूक करणारे हे दाम्पत्य सद्ध्या कुठे आहे याची कोणालाच कल्पना नाही. कणकवली, कुडाळमध्ये फसवणूक करून फरार असलेले हे दाम्पत्य कोणालाही दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार व माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल असे श्री.अभिजित प्रल्हाद परब यांनी जाहीर केले आहे.

श्री.अभिजित प्रल्हाद परब.
संपर्कासाठी क्रमांक…
8433545874 / 8275708067.

प्रतिक्रिया व्यक्त करा