You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाच्या समस्यांबाबत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आक्रमक

वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाच्या समस्यांबाबत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आक्रमक

इंग्राजांच्या काळात खंडाळा घाट रस्ता मार्ग दाखवणा-या मा.शिंग्रोबा धनगर यांचा वंशज(धनगर समाज) रस्यापासुन वंचीत का…..? नवलराज काळे यांचा संतप्त सवाल

कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे व समाज बांधवांनी दिले तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन

वैभववाडी

आचिर्णे -अरुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत आराखड्यात मंजूर असलेला रस्ता प्रत्यक्ष सुरू होणे बाबत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे,अरुळे ग्रामपंचायत माजी सदस्य सुर्यकांत अनंत बोडके व आचिर्णे ग्रामपंचायत माजी सदस्य नवलु पांडुरंग झोरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांच्या साक्षीने तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले आहे. सदर काम लवकरात लवकर प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.


त्याचबरोबर संपूर्ण वैभववाडी तालुका धनगर समाजाचे प्रश्न हातामध्ये घेऊन प्रथम प्राधान्याने दळणवळण प्रश्नावर आवाज उठवण्यात आला. इंग्रजांच्या काळात खंडाळा घाट रस्ता मार्ग दाखवणारे धनगर पुत्र मा. शिंग्रोबा धनगर यांचे वंशज आम्ही धनगर समाज आणि हाच धनगर समाज 21 व्या शतकात रस्त्यापासून वंचित का….? सगळीकडे १०८ रुग्णसेवेचा बोलबाला असताना धनगर समाज बांधवांना डोलीचा आधार घ्यावा लागतो असे का..? जंगलातील हिंस्र प्राण्यांची टांगती तलवार,डोंगर झाडीतील पायवाट,खांद्यावरील डोलीत निपचित पडलेला रुग्ण नि जिव मुठीत धरुन मैलो/मैल अंतर कापुन काट्या कुट्यातून धावणारे ग्रामस्थ हे विदारज चित्र 21 व्या शतकातील आहे.मानवजातीने अगदी चंद्रावर प्रवेश केला,पन माझ्या या धनगर समाजाला अद्याप दळणवळणाची सोय होईना.एकविसव्या,शतकात रस्ता,पाणी,आरोग्य सुवधांअभावी धनगर समाज वनवास भोगत आहे ही शोकांतीका आहे.वस्तीवर रस्ता नाही म्हणुन अनेक सुविधांन पासुन जनता वंचीत आहे. गावातील युवक दळणवळणाची सोय नाही म्हणून मुंबईला पळतात गावाकडचे घर अशीच बंद पडायची वेळ आली, कारण गावात घरी जायला रस्ता नाही जोपर्यंत दळणवळणाची सोय होत नाही तोपर्यंत वैभववाडी तालुका धनगर वस्तीच्या विकासाला गती मिळणार नाही. तालुक्यातील दळणवळणाची सोय होण्यास मुख्य अडचण म्हणजे रस्त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध न होने, जागा उपलब्ध असेल तर निधी मिळत नाही, निधी मिळाला तर तुटपुंजा त्यात मग रस्ता कटींग झाला तर खडीकरण,डांबरीकरण नाही, अधि मधी येणा-या ओढ्याना,नदींना हवे तसे ब्रीज होत नाहीत. अशी अवस्था संपुर्ण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील धनगर वस्तींची झाली आहे.
तालुक्यातील काही धनगर वस्तींमधील आजारी व्यक्ती,वृध्द व गरोदर मातेंच्या पाचविलाच सुविधेचा वानवा पुजलेला आहे. चिव्याने विणलेल्या डालग्याच्या डोलीत किंवा पाळण्याच्या डोलीत घोंगडे पसरुन रुग्णाला बसविले जाते. डोलित दोन्ही बाजुला बांबु घालुन चौघेजण खांद्यावर घेऊन रुग्णाला दवाखाण्यापर्यंत नेण्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत धाव घेतात. गेल्या 3 – 4 पिढ्यांतील वास्तव चित्र बदलणार कधी…? असा प्राश्न आम्हा युवा पिढीला पाडला आहे.
सर्वत्र 108 च्या सुविधेचा बोलबाला असताना या धनगर वस्तींवरील डोली खांद्यावर घेऊन धावणारे ग्रामस्थ सुविधांचा सुर्य उगवण्याची वाट पाहत आहेत.येथिल घनघोर पावसाळा तर आम्हा वनवाशी मंडळींची झोप उडवतो.घसरगुंडी करितच पाठीवर रुग्ण घेऊन धोकादायक पायपीठ नशीबी असल्याची व्यथा मांडत प्रस्थापित राज्यकर्त्यांचा व प्रशासनाचा नवलराज काळे यांनी निषेध व्यक्त केला.प्रशासनाच्या व प्रस्थापित राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे.तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत तालुक्यातून बरेच धनगर वस्तींच्या विकासकामांचे आराखडे मंजूरीसाठी शासनाच्या टेबल वरती धूळखात पडलेले आहेत त्यांना मंजुरी कधी मिळणार…? वाडीवस्तीवर जाणाऱ्या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमीनीचे भूसंपादन करणे गरजे आहे ते कधी होणार..? असे प्रश्न विचारतात नवलराज काळे यांनी प्रामुख्याने केलेल्या दोन मागण्या खालील प्रमाणे …
1- सर्वात प्रथम वाडी तीथे रस्ता हे उद्धीष्टे ठेऊन 23 नं नोंद नसलेल्या वाडी जोड रस्त्यांसाठी लागण्या-या जमिनींचे भु-संपादन शासनाकडुन व्हावे. ज्यांचा विरोध आहे त्यांना कायदेशीर समज देऊन असे विषय मार्गी लावन्यात यावे. मागिल शतकात तोंडी समंतीवर काही 26 नं नोंदी(आत्ताच्या23 नं. नॊदीं) झालेल्या आहेत व पायवाटा / वहिवाट असलेल्या वाटांवर रस्ता करणे, तसेच शासनाकडून होणाऱ्या भूसंपादन प्रक्रिया लवकर करून मिळाव्या त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी व भूसंपादन कार्यपद्धतीवर काही जाचक अटी आहेत त्या कमी करून मिळाल्या व भुसंपादन प्रक्रियेला अर्ज करणे पासुन ते निकाल लागे पर्यंत नियोजित कार्यकाल ठरवावा(उदा.3,6,12 महिनेच्या आत हि प्रक्रिया पुर्ण झालीच पाहिजे असे नियोजन शासन स्तरावर व्हावे भुसंपादन प्रस्ताव ग्रामपंचायत कडून प्रशासनाने मागुन घ्यावे ) त्यामुळे समाजातील बहुतांश धनगर वाड्या वस्तीवर रस्ता पोहोचण्यास मदत होईल.
2- तसेच निधी साठी ही वन वन करावी लगते, वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर तांडा/वस्ती सुधार योजने मधे धनगर समाजाच्या वस्तींच्या विकांसासाठी निधी मिळु शकतॊ. तालुक्यातील सर्ववस्त्यांच्या विकासकामांचे आराखडे शासना कडे मंजुरीसाठी गेले होते.पण आद्याप त्यांना मंजुरी का मिळाली नाही त्या आराखड्याची फ़ाईल शासनाच्या टेबल वर धुळ खात का पाडली आहे. या योजने कडे आपण जर बारकाईने लक्ष घातले तर बहुतांशी धनगर वस्तींमधील विकासकांच्या निधीचा प्रश्न सुटले असते. परंतु सरकार आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. लवकरात लवकर तांडा वस्ती योजनेच्या आराखड्याना मंजुरी मिळावी.
गेले दोन वर्ष या संदर्भात प्रशासनाची पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही, येणाऱ्या 26 जानेवारी 2022 पर्यंत सदर मागण्या मान्य न झाल्यास ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सर्व संघटना प्रमुख समाज बांधव यांना सोबत घेऊन 27 जानेवारी 2022 रोजी वैभववाडी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असा थेट इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे व उपस्थित समाज बांधवांनी दिला.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव ॲड. विक्रमसिंह काळे, अरुळे ग्रामपंचायत माजी सदस्य सुर्यकांत अनंत बोडके, आचिर्णे ग्रामपंचायत माजी सदस्य नवलु पांडुरंग झोरे, धुळाजी आप्पाजी काळे (आचिर्णे), नाऊ धाकलू बोडेकर (खांबाळे दार्या) जनार्दन धोंडू बोडके (आचिर्णे), जनार्दन बाबू बोडके (अरुळे), मधुकर विठोबा कोकरे (कुर्ली),भागीरथी नाऊ बोडेकर(खांबाळे दार्या) व इतर समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 5 =