You are currently viewing खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी…

सावंतवाडी
सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीम कडून काल बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना खवले मांजराच्या खावल्यांची तस्करी करून व्यवहार करत असताना ताब्यात घेण्यात आले होते.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आरोपी क्र.१- नारायण सावळाराम नाईक, वय-48 वर्षे, आरोपी क्र.2- सद्गुरू मारुती नाईक, वय-52 वर्षे अशी आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अंदाजे 2 किलो वजनाचे खवले मांजराचे खवले व एक दुचाकी (अंदाजे रक्कम-50 हजार रु.) हस्तगत करण्यात आली. सदरच्या अटक आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर आरोपींना आज सावंतवाडी कोर्टमध्ये हजर केले असता मा.न्यायालयाने अटक आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. या मध्ये न्यायालयाने सदरचा वन गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मत निंदविले. न्यायालयामध्ये वन विभागाची बाजू सक्षमपणे वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी मांडली. आरोपीच्या बाजूने ऍडव्होकेट श्री. परिमल नाईक यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ही कोर्टकेस कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री.एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक श्री.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, प्रमोद राणे, वनरक्षक महादेव गेजगे, सागर भोजने, संग्राम पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा