You are currently viewing तेजोनिधी स्वामी विवेकानंद

तेजोनिधी स्वामी विवेकानंद

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सायली कुलकर्णी यांची स्वामी विवेकानंदजींच्या जन्मतिथी निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

होते पसरले दैन्य
धर्म ग्लानिमय झाला
तेव्हा कोलकत्ता येथे
दीप ज्ञानाचा जन्मला

लहानग्या नरेंदाची
होती बुद्धी अलौकिक
पुढे रामकृष्ण यांनी
पैलू पाडले अचूक

रामकृष्ण मिशनची
केली तयांनी स्थापना
धर्मप्रसारार्थ केले
समर्पित स्व जीवना

बंधू आणि भगिनींनो
दिली शिकागोत साद
साऱ्या अमेरिकेमध्ये
उमटले पडसाद

योग वेदांवर दिली
त्यांनी कित्येक व्याख्याने
वक्तृत्वाने जिंकलेली
होती श्रोत्यांची हो मने

स्वामी विवेकानंद ही
त्यांना मिळाली उपाधी
ज्ञान, प्रेम, विवेकाचे
होते स्वामी तेजोनिधी

© सायली कुलकर्णी
वडोदरा,

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =