You are currently viewing तळेरे कार मोटरसायकल अपघातात वृद्ध ठार

तळेरे कार मोटरसायकल अपघातात वृद्ध ठार

कणकवली

मुबंई गोवा महामार्गावर कार आणि मोटरसायकल यांच्या अपघातात मोटरसायकलवरील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महामार्ग उड्डाणपुलनजीक तळेरे येथे घडली.

गीतेश गुणाजी जाधव ( रा.कोंडये, ता.राजापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गीतेश आपले वडील गुणाजी भिवा जाधव ( वय ७० ) यांच्यावर कणकवली येथे वैद्यकीय उपचार करून राजापूर च्या दिशेने आपल्या ताब्यातील मोटरसायकल हिरो पॅशन प्रो ने जात होते.नॅशनल हायवेवर तळेरे उड्डाणपूल संपते त्या ठिकाणी जाधव यांच्या मोटरसायकल च्या मागून एस क्रॉस कारने भरधाव वेगात येऊन मोटरसायकल ला ओव्हरटेक करत सिग्नल न देता सर्व्हिस रोड च्या दिशेने कार वळवली.

त्याचवेळी गीतेश जाधवच्या ताब्यातील मोटरसायकल ची कारला धडक बसून मोटरसायकल वर मागील सीटवर बसलेले गुणाजी जाधव व गीतेश हे दोघेही हायवेवर पडले. या अपघातात गुणाजी जाधव यांच्या डोक्याला मार लागला तर गीतेशला किरकोळ दुखापत झाली. अपघातग्रस्त गुणाजी याना तात्काळ ऍम्ब्युलन्स मधून कणकवलीत खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथून उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमी गुणाजी याना तपासले असता ते मृत झाल्याचे डॉक्टर नी घोषित केले. याबाबत कार चालक दिलीप नावले याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 15 =