You are currently viewing स्वातंत्र्य स्फूर्ती देवतेला वंदन

स्वातंत्र्य स्फूर्ती देवतेला वंदन

*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त लिहिलेली स्फूर्तीदायी काव्यरचना*

 

*“स्वातंत्र्य स्फूर्ती देवतेला वंदन”*

 

स्वातंत्र्याच्या स्फूर्ती देवतेला करू वंदन

राज्ञी लक्ष्मीबाई वीरांगिणी होत धैर्यवान IIधृII

 

राणी लक्ष्मीबाईंचा जन्म झाला वाराणसींत

माता भागीरथीबाई पिता होत मोरोपंत

पती लाभले गंगाधरराव कर्तृत्ववानII1II

 

माता पिता छत्र हरपले बालवयांत

शिके घोडे स्वारी भाले तलवार चालवणं

व्यायाम कुस्ती मलखांब सराव निपुणII2II

 

स्वराज्य रक्षिणी फिरंग मर्दिनी महान

शस्त्र धारणी समर भवानी आदर्श द्योत

लक्ष्मीबाई क्रांती नायिका करी सर्वां सचेतनII3II

 

महापराक्रमी चतुर युद्ध शास्त्र पारंगत

सैन्यां करी आश्वासक गरिबांचे करी कल्याण

इंग्रजांशी लढताना पत्करले वीर मरणII4II

 

©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा