You are currently viewing सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादसावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर शिवकालीन हनुमंत गडाच्या पायथ्याशी अतिदुर्गम स्थानी असलेल्या फुकेरी गावात सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात १०३ जणांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.
फुकेरी सारख्या ग्रामीण व अतिदुर्गम भागातील गरजू रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणाची आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठानस्थानच्यावतीने आरोग्य शिबिरासाठी अतिदुर्गम व दुर्गम गावांचीच निवड केली जाते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यासह शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक अभिनव उपक्रम सातत्याने राबविले जातात.
या शिबिरात प्रत्येक रुग्णांची उपाशी पोटी व भरलेल्या पोटी अशी दोन वेळा ब्लड शुगरसह बाकी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात कोविड १९ नियमावलीचे तंतोतंत पालन करून रुग्णांना सॅनिटाइझरसह मास्क वितरण करण्यात आले. सिंधुमित्रांच्या या वैद्यकीय सेवाभावाबाबत फुकेरीवासियांनी आभार मानले.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, हृदय व मधुमेह तज्ञ डॉ नंदादीप चोडणकर, नेत्ररोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्री रोग डॉ मुग्धा ठाकरे, डॉ राहुल गवाणकर यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र भार्गवराम शिरोडकर, अँड्र्यू फर्नांडिस, आसिफ शेख, भगवान रेडकर, रवी जाधव, दिपक गावकर, सिद्देश मणेरीकर, संतोष नाईक, ओंकार देवधर या सिंधुमित्रांनी केले. यावेळी फुकेरी सरपंच सावित्री नाईक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम आईर, ग्रामपंचायत सदस्य अमित गवस, गजानन आईर, शंभा आईर, ग्रामसंघ अध्यक्षा जोस्ना आईर, पोलीस पाटील महेश आईर, महादेव आईर, दिनेश आईर, बाळू आईर, ज्ञानेश्वर आईर, संदीप आईर, संतोष आईर, शिवराम आईर, दिलीप आईर आदी फुकेरी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 5 =