You are currently viewing चौके येथे रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये अपघात

चौके येथे रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये अपघात

दोन्ही वाहनांचे नुकसान ; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

मालवण

मालवण -कसाल मार्गावर चौके वावळ्याचे भरड येथील छोटया वळणावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण येथून नाशिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर (MH 15 EF 6399) आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या खाजगी रुग्णवाहिकेची (MH07 AJ 6241) धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातची खबर उशीरा मालवण पोलीस ठाणे येथे देण्याची प्रक्रिया सुरू होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा