You are currently viewing खासदार नारायण राणे यांनी केले मनिष दळवी आणि कुटुंबीयांचे सांत्वन

खासदार नारायण राणे यांनी केले मनिष दळवी आणि कुटुंबीयांचे सांत्वन

वेंगुर्ले :

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी मनिष दळवी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी सौ. नीलमताई राणे, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत, सायमन अल्मेडा, समीर कुडाळकर, ज्ञानेश्वर केळजी, राजू परब, शेखर परब, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा