You are currently viewing फीट येऊन मोटरसायकल वरुन पडल्याने नेरुरचा युवक जखमी

फीट येऊन मोटरसायकल वरुन पडल्याने नेरुरचा युवक जखमी

बांदा 

झाराप – पत्रादेवी महामार्गावर बांदा पोलीस चेकपोस्ट नजीक मोटरसायकलवरुन कोसळल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. विशाल विजय चव्हाण (२५, रा. हळदीचे नेरुर, कुडाळ) असे त्याचे नाव आहे.

फीट आल्याने तो मोटरसायकल वरुन पडला असावा असा अंदाज बांदा पोलीसांनी व्यक्त केला. स्थानिकांनी जखमी अवस्थेत त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. बांदा पोलीस दीपक लोंढे, विजय जाधव घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =