You are currently viewing रक्तसेवेत आदर्शवत नवा सिंधुदुर्ग पॅटर्न ! गाव करेल ते राव काय करेल!

रक्तसेवेत आदर्शवत नवा सिंधुदुर्ग पॅटर्न ! गाव करेल ते राव काय करेल!

शासन म्हणते त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा आहे ही गोष्ट खरी आहे. पण महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग हा जिल्हा वगळून! सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण रक्ताचा तुटवडा भासू दिलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था चढाओढीने या क्षेत्रात दृष्ट लागण्यासारखे काम करताहेत. या संस्थांच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते, सिंधुदुर्गातील रक्तदाते कोणाच्याही अडचणीत हिरीरीने धावून जात आहेत. अतिशय छान आणि स्तुत्य काम करताहेत सारेजण! त्यांनी कधीही कोणा गरजवंताला विन्मुख परतवलेले नाही.

आजची स्थिती अशी आहे की रक्तदानाची शिबिरे आपल्याला थांबवावी लागत आहेत. उत्साही रक्तदात्यांना नको म्हणून सांगावे लागत आहे. पुढील तारखा फुल्ल आहेत. आज सिंधुदुर्गात रक्ताचा अजिबात तुटवडा नाही. तुटवड्याची व्याख्याच सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे कोरोनाच्या भर काळातही आपण शक्य केले आहे. या काळातही या सगळ्याचे यशस्वी नियोजन केले असा हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यातील एकमेव जिल्हा आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. रक्तसेवेतील पुढील सर्व टप्पे गाठण्यासाठी सर्व संस्था एकत्र येत रक्तसंवाद अभियान राबवत आहेत. भविष्यात सर्वसामान्य माणसाशी “रक्ताचे नाते” असणाऱ्या या उपक्रमासाठी प्रत्येकाचा सहभाग नक्कीच असेल आणि रक्तदान व रक्तसेवेच्या क्षेत्रात सिंधुदुर्ग अव्वलच नव्हे, उत्तुंग असेल. सामान्य माणसे एकत्र येऊन काय बदल घडवू शकतात, याचे उत्तम उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्याने समोर ठेवले आहे. याच नियोजनातून संपूर्ण महाराष्ट्रात रक्तमित्रांची मजबूत साखळी जोडण्याचे काम चालू आहे.

(नाते रक्ताचे रक्ताशी@कमळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग)

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + ten =