You are currently viewing शिष्यवृती परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेचे दैदिप्यमान यश

शिष्यवृती परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेचे दैदिप्यमान यश

बांदा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आॉगस्ट २०२१मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील पाच विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दैदिप्यमान कामगिरी करून शाळेच्या शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम राखली.
या परीक्षेत अमोघ राजेश वालावलकर ,वेदांत संदीप सावंत ,सारा साहिद शेख ,युग्धा दिपक बांदेकर,तनिष्का प्रशांत चिंदरकर विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ग्रामीण शिष्यवृत्ती यादीत स्थान मिळवले असून या विद्यार्थ्यांचे बांदा सरपंच अक्रम खान ,शाळा व्यवस्थापन समिती निलेश मोरजकर, केंद्रप्रमुख संदीप गवस ,मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. यावेळी सुनिल धामापूरकर ,समीर कल्याणकर,सुनिल राऊळ ,दत्तगुरु म्हाडगुत आदि उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत,वंदना शितोळे,उर्मिला मोर्ये, रूईजा गोल्सलविस ,रसिका मालवणकर ,रंगनाथ परब ,जे.डी .पाटील ,जागृती धुरी,प्राजक्ता पाटील,शितल गवस यांचे मार्गदर्शन मिळाले .
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर व बांदा ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा