You are currently viewing कोरोना नुकसानग्रस्तांना अर्थसहाय्यासाठी दशावतार कलाकारांचाही सहभाग व्हावा

कोरोना नुकसानग्रस्तांना अर्थसहाय्यासाठी दशावतार कलाकारांचाही सहभाग व्हावा

जि.प. सभापती अंकुश जाधव यांची मागणी

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांसमवेत धरणे आंदोलन

कोव्हीडमुळे बंद झालेल्या लोककलांच्या कलाकारांना अर्थ सहाय्य देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत कोकणची लोककला असलेल्या दशावतार कलेला वगळण्यात आले आहे. कोव्हीडमुळे पारंपारिक दशावतार नाट्य प्रयोग बंद असून त्यांचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कलाकारांच्या उपजीविकेवर झालेला आहे. तरी सदर कलेचा समावेश करुन सुधारीत प्रस्ताव मागविण्या यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली आहे.
लोककला तसेच पारपारिक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना अर्थसहाय्य देणेबाबतचे आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर आवाहनामध्ये पात्रतेच्या अटी शर्तींमध्ये असलेल्या कलाकारांचे तपशिलामध्ये तमाशा, खडीगंमत, वासुदेव पोतराज चित्रकथी, बहुरुपी, किर्तनकार प्रबोधनकार वारकरी कलेचा समावेश दिसून येत आहे. तथापी दशावतार कलाकाराचा समावेश होणे गरजेचे असतांनाही समावेश झालेचा दिसून येत नाही.
सद्यस्थितीत पारंपारिक दशावतार नाट्य प्रयोग बंद असून त्यांचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कलाकारांच्या उपजीविकेवर झालेला आहे. तरी सदर कलेचा समावेश करुन सुधारीत प्रस्ताव मागविण्या यावेत. याबाबत उचित कार्यवाही न झालेस नाइलाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दशावतार कलाकार समवेत धरणे आंदोलन करणेचा निर्णय दशावतार कलाकार यांना घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 6 =