You are currently viewing बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी २६ जानेवारीला बेमुदत उपोषण छेडणार – अक्रम खान

बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी २६ जानेवारीला बेमुदत उपोषण छेडणार – अक्रम खान

वारंवार मागणी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा सार्वजनिक बांधकामवर आरोप

बांदा

बांदा ते दोडामार्ग रस्त्याचे डांबरीकरण करून तो दुरुस्त करावा. अशी वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही अजूनही सबंधित रस्ता पूर्णपणे दुरुस्त न केल्याने, येत्या”प्रजासत्ताक दिनी” २६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून बांदा-दोडामार्ग रस्त्यावर सर्कलच्या नजीक बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बांदा सरपंच अक्रम खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा ते दोडामार्ग रस्ता वाहतुकीसाठी संपूर्ण खराब झाला असून, तो दुरुस्त करण्यात यावा, यासाठी येथील स्थानिकांनी बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप देखील हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. आज देखील हा रस्ता अपूर्ण स्वरूपात असून, संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे जीवावर बेतणारे आहे.
अपूर्ण रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरण विभागाने पाण्याची जलवाहिनी टाकताना रस्ता दुरुस्तीचे पैसे आपल्या विभागाला वर्ग केलेले आहेत. मात्र असे असूनही आपल्याकडून रस्ता दुरुस्तीसाठी कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आपण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
यावेळी उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, मकरंद तोरसकर, बाळू सावंत, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =