भावाला दिला बहिणीने अग्नी..

भावाला दिला बहिणीने अग्नी..

वेंगुर्ला

वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथील रहिवासी व कट्टर क्रिकेटवेडा रामचंद्र काशीराम पोखरे उर्फ रामा (६९) याचे आज सोमवार १९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याला अग्नी देणारी नात्यातील एकमेव असलेली त्याची बहीण शांती किनळेकर यांनी दाडाचेटेंब या येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
भाऊ हा बहिणीचे सर्व संकटात रक्षण करतो तो बहिणीला बांधलेल्या रक्षाबंधन या धार्मिक सणातून असे सांगितले जाते. पण त्याच भावा अखेरचा अग्नी देण्याची वेळ त्याच्या एकुलत्या बहिणीवर आली. या प्रकाराची चर्चा संपूर्ण वेंगुर्ला शहरात होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा