You are currently viewing युथ क्लब महाड आणि सुनील गांधी क्लासेस आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर महाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये संपन्न.

युथ क्लब महाड आणि सुनील गांधी क्लासेस आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर महाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये संपन्न.

युथ क्लब महाड आणि सुनील गांधी क्लासेस आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर महाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये दि: १४ मे २०२२ रोजी संपन्न झाली.
तिमिरातूनी तेजाकडे ह्या संकल्पनेतून मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर ह्यांनी आज महाड मध्ये ९३ वी मोफत मार्गदर्शन शिबिर घेतली. ह्या शिबिर मध्ये महाड मधील विविध वयोगटातील मुले मुली आणि पालक असे २०० हून अधिक लोक ह्यांनी उपस्थिती दर्शवली. शिबिर ची प्रस्तावना सौ. स्नेहा सुनील गांधी ह्यांनी केली. श्री. सत्यवान रेडकर ह्यांचे स्वागत महाड आणि महाराष्ट्रातील प्रख्यात बाल रोग तज्ञ श्री. डॉ. शेखर दाभाडकर ह्यांनी केले. श्री. सत्यवान रेडकर हे स्वतः विविध पदवीधर आहेत B.com M.com, MA Hindi, LLB,PGDHRM,PGDLL & IR PGDT. आपल्या शिबिर मध्ये त्यांनी आपला जीवनाचा प्रवास कसा खडतर होता ह्यातून तुम्ही कशी प्रेरणा घ्याल हे नमूद केले.सरकारी नोकरी म्हणजे फक्त MPSC,UPSC नसून अजून अनेक विविध विभाग काय आहेत हे त्यांनी लोकांना सांगितले. बऱ्याच मुलांनी हे विभाग समजून घेऊन आपल्या पुस्तकात नमूद केले.नोकरी कडे कसा कल असावा, सरकारी नोकरी ची संधी कशी आपल्याला उपयोगी येऊ शकते ह्यावर आपले विचार मांडले. वैदिक गणित पद्धतीचं वैशिष्ट, सामान्य ज्ञान, इतिहास ,भूगोल , व्याकरण, इंग्रजी च महत्त्व,असे अनेक विषय ज्यातून पाया मजबूत होतो आणि हे सर्व सरकारी परिक्षा साठी उपयुक्त कसं ठरत ह्याची उदाहरणे दिली. तसेच, कोकण भागातील मुले ह्या संधीचा फायदा जास्त घेत नाहीत म्हणून त्यांना मोटिवेट केले.महाराष्ट्रातील आपली माणसे सर्वच सरकारी शाखेत उच्च पदावर असायला पाहिजे ह्याच स्वप्न ते पाहत आहेत. २.३० तासाच्या शिबिर मध्ये हे एकटे वक्ते होते. लवकरच १०० वी शिबिराचा पट्टा ते गाठणार ह्याचा विश्वास त्यांनी दर्शविला. असंख्य संख्येने महाडकर उपस्थित राहिले त्यासाठी त्यांनी महाडकरांचे आणि युथ क्लब चे अध्यक्ष श्री. संतोष सकपाळ व सुनील गांधी क्लासेस ह्यांचे आभार मानले. व्याख्यान संपल्यावर उपस्थित काही लोकांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रम उत्तम झाला आणि ह्याचा आम्ही नक्कीच फायदा करून घेऊ हे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युथ क्लब महाड चे अध्यक्ष श्री. संतोष सकपाळ, श्री. अजिंक्य प्रमोद वाळंज, कु. प्रणित गांधी ह्यांनी चांगले नियोजन केले. आभार प्रदर्शन करताना ह्या संधीचा आपल्या महाड करांनी जस्तीती जास्त फायदा घ्यावा असे आव्हान देखील ह्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 12 =