You are currently viewing पत्रकार दिनानिमित्त सांगली येथे पत्रकार सन्मान व पुरस्कार पदवीप्रदान समारंभ संपन्न

पत्रकार दिनानिमित्त सांगली येथे पत्रकार सन्मान व पुरस्कार पदवीप्रदान समारंभ संपन्न

सांगली येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित सांगली जिल्हा इंडियन प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार सन्मान व पुरस्कार पदवीप्रदान करण्यासाठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता
सिंहसतभातील चौथ स्तंभ म्हणजे पत्रकार होय आपण समाजाचं काही तरी देण लागतो ही भावना मनात घेऊन गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कानाकोपऱ्यात घडणारया सर्व सुखाच्या दुःखाच्या घटना राजकीय सामाजिक संघटना पक्ष यामधील सर्व बातम्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम मग काळ कोणताही असो कोरोना. पुर ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. जळीत. आत्महत्या. खुन. अशा एक नाही अनेक घटनांसाठी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता रांत्र दिवस काम करणारा आमचा पत्रकार समाजांचा एक अविभाज्य घटक आहे
केंद्रीय सल्लागार पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
इस्लामपूर शहरातील रहिवासी व कामगार चळवळ जीवंत ठेवणारे. वास्तववादी लेखन करणारे. जनजागृती जनसंबोधन जनप्रबोधन यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर व मुंबई डेज चे पत्रकार अहमद नबीलाल मुंडे यांचा वास्तववादी लेखक म्हणून फुलगुचछ देवून सन्मान करण्यात आला.

त्यावेळी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन चे सांगली जिल्हा अध्यक्ष चाॅद गफूर शेख व आमचे सहकारी हिरकणी न्युज वार्ताहर मोहन सताळकर उपस्थित होते लेखक आणि लेखण करणारे यांची आज समाजाला गरज आहे असे मत हाजी अब्दुल भाई शेख यांनी मांडले

प्रतिक्रिया व्यक्त करा