You are currently viewing प्रदूषण मुक्तीचा संदेश घराघरात पोचवावा-सुभाष पुराणिक.

प्रदूषण मुक्तीचा संदेश घराघरात पोचवावा-सुभाष पुराणिक.

वैभववाडी

प्रदूषण ही एक ज्वलंत मानव निर्मित सामाजिक समस्या आहे. या मानव निर्मित समस्येचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. प्रदूषणाच्या निर्मूलनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रदूषण मुक्तीचा संदेश घराघरात पोचवला पाहिजे असे सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्गचे विभागीय वन अधिकारी श्री.सुभाष पुराणिक यांनी सांगितले.

मंगळवार दिनांक ४ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.३० वा. सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग वनपरिक्षेत्र वैभववाडी आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम अंतर्गत प्रदूषणमुक्ती जनजागृतीसाठी दत्तमंदिर वैभववाडी ते कासार व्हाळ वाभवे या मार्गावर सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक वनसंरक्षक श्री.योगेश सातपुते, कणकवली वनक्षेत्रपाल श्री. विनोद बेलवाडकर, वैभववाडी वनक्षेत्रपाल श्री. प्रकाश पाटील, वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. तेजस साळुंखे, वनरक्षक श्री.एस.एस.कुंभार, सौ.व्ही.बी.जाधव, श्री.आचरेकर, श्री.टी.बी.ढवण, श्री‌.एस.पी.परब, क्रीडाशिक्षक श्री.संदेश तुळसणकर, श्री.मंदार चोरगे, श्री.प्रशांत ढवण, श्री.मनोज मानकर व श्री.कमलाकर साटम आदी उपस्थित होते.

आपण करीत असलेला प्लास्टिकचा वापर, इंधनावर चालणारी वाहने, तापमान वाढ, आवाज व पाण्याच्या प्रदूषणाचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहे. सायकल रॅली आयोजित करून इंधन वाचवणे हा एक उद्देश आहे. एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे असे पुराणिक यांनी सांगितले.
या प्रदूषणमुक्ती जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीमध्ये तमिश अडुळकर, श्रेयांक पाटील, राहुल बोडेकर, महेश पडीलकर, भौमिक घाडीगावकर, पार्थ एकावडे, श्रेया कदम, आर्यन चव्हाण, सिद्धार्थ मोहिते, जयेश खरात, प्रशांत ढवण व तेजस साळुंखे हे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. या सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ.एस. एस.काकडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन अशा कार्यक्रमांना महाविद्यालयाचे सहकार्य राहील असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपाल श्री. प्रकाश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वनक्षेत्रपाल श्री.विनोद बेलवाडकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − four =