You are currently viewing चौके मांडखोल जि. प. प्राथमिक शाळेकरिता आर्थिक मदत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चौके मांडखोल जि. प. प्राथमिक शाळेकरिता आर्थिक मदत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मालवण :

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गावातील मांडखोल वाडीतील दानशूर व्यक्ती श्री. बाबू दुखंडे यांनी प्रती विद्यार्थी एक स्कूल बॅग तसेच शैक्षणिक साहित्य दिले. तर शाळेच्या इतर गरजांसाठी यांच वाडीतील श्री. अभिमन्यू चव्हाण यांनी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे बांधकाम समिती सभापती श्री. महेंद्र चव्हाण, चौके गावचे सरपंच श्री. राजन शशिकांत गावडे, श्री. अभिमन्यू चव्हाण, श्री. बाबू दुखंडे, श्री.विजय दुखंडे, मुख्याध्यापक श्री.पराडकर सर, श्री आहिरे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सत्यवान मारुती गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.मयुर गावडे, श्री.गोपाळ चव्हाण, श्री.शामसुंदर मेस्त्री, श्री.अमोल गायकवाड श्री.अभय चव्हाण,पूजा सांडव, श्रावणी गावडे, राजश्री कासले, सुप्रिया गावडे मॅडम, मोहिनी गायकवाड, वासंती पार्टे, सोनाली गावडे तसेच ग्रामस्थ- विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा