You are currently viewing कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक स्पेशल फेस्टिव्हल एक्सप्रेस…

कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक स्पेशल फेस्टिव्हल एक्सप्रेस…

मडगाव -पुणे, नागपूर – मडगाव साप्ताहिक धावणार…

कणकवली
कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एकामागोमाग एक रेल्वेगाड्या सोडण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार २३ ऑक्‍टोबरपासून कोकण मार्गावर नागपूर-मडगाव व पुणे-मडगाव साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन रेल्वेगाड्यांमुळे मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता.२१) पासून वास्को द गामा-पटना ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी धावणार आहे. २१ डब्यांच्या या गाडीला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी स्थानकांवर थांबे दिले आहेत.
पुणे-मडगाव फेस्टिव्हल स्पेशल २३, ३० ऑक्‍टोबर व ६ नोव्हेंबर या दरम्यान धावणार आहे.
पुणे येथून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वा. मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ४ वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वा. पुणे येथे पोहचेल. २२ डब्यांच्या या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी ठिकाणी थांबे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा