You are currently viewing सावंतवाडी मळगाव घाटीच्या दरीत कोसळली स्वीफ्ट कार

सावंतवाडी मळगाव घाटीच्या दरीत कोसळली स्वीफ्ट कार

माकड अचानक आडवे आल्याने झाला अपघात

सुदैवाने चालक बालबाल बचावले : कारचे नुकसान

सावंतवाडी

सावंतवाडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या ठिकाणावरून स्विफ्ट कार खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले मात्र कारचालक सुदैवाने बालबाल बचावले. ताराचंद बाबुराव राठोड ( ४१, रा. सावंतवाडी, मूळ रा. उस्मानाबद ) असे त्यांचे नाव आहे. ताराचंद हे आरोंदा हायस्कूलचे शिक्षक असून ते प्रशालेतून सावंतवाडी शहरात परतत असताना हा अपघात झाला.

मुलाला उस्मानाबाद येथे गावी सोडण्यासाठी ते शहरात लवकर येत होते. मात्र माळगाव घाटीत आले असताना अचानक पणे माकड आडवे आल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्नात त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी तुटलेल्या कठड्याच्या ठिकाणावरून दरीत कोसळली. या अपघातात किरकोळ जखमा वगळता त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघाताबाबत उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 2 =