You are currently viewing कविकुलगुरू कालिदास पुरस्काराचे २६ जून रोजी वितरण

कविकुलगुरू कालिदास पुरस्काराचे २६ जून रोजी वितरण

पणजी, ता.

कोकण मराठी परिषद गोवा या संस्थेतर्फे देण्यात येणारा कविकुलगुरू कालिदास पुरस्कार नामवंत कवी, लेखक, निरुपणकार यंदा घनश्याम बोरकर यांना येत्या २६ जून २०२५ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम होईल, अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव शिवाजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

घनश्याम बोरकर यांचा परिचय साहित्य, नाट्य संगीत, वैद्यक, अभियांत्रिकी, छायाचित्रकला अशा अनेक क्षेत्रात त्यांचा संचार असतो. त्यांचे शिवमत भैरव, कालजयी व शरणयोग हे तीन काव्यसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केले आहेत. बोरोप्लास्ट कंपनीचे ते संचालक आहेत. त्यांनी वाद्यसंगीतात प्रावीण्य मिळविले असून त्यांनी १५० प्रयोगात मेंडोलिनची साथ केली आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धांत यश मिळविवे आहे, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धांत व मुंबई महापालिकेच्या नाट्यस्पर्धांत त्यांनी नाटके सादर केली आहेत. उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, पूर्णवाद मंडल अहल्यानगर, आणि जीवनकला मंडळाचा काव्यसमीक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. गाजलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरणाचे प्रयोग त्यांनी गोवा व महाराष्ट्रात केले आहेत. बा. भ. बोरकरांच्या कवितेवर घन बरसे रे हा कार्यक्रम, सुरेश भट यांच्या कवितांवर एल्गार या कार्यक्रम ते सादर करतात.

वयाच्या १४ व्या वर्षांपासून ते कविता लिहित आहेत. त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा आरती प्रभू पुरस्कार रामचंद्र महाराज पारनेरकर महाराज अक्षर वाङ्मय पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृतिप्रतिष्ठानचा पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. पुरिया हा हिंदी कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. म्हजो निळो एकांत हा कोकणी कवितासंग्रह प्रसिध्द आहे.

गोव्यात ३ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या अंत्रुज मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निव़ड. शिवमत भैरव या काव्यसंग्रहास कविवर्य माधवानुज पुरस्कार कल्याण सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रदान, कालजयी या संग्रहाला इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिरातर्फे २०२४ चा इंदिरा संत पुरस्कार कोकण मराठी परिषदेतर्फे दरवर्षी गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिकाला हा पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम, शाल, श्रीफळ मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा