You are currently viewing वायंगणीत विकास संस्थेवर शिवसेना पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व 

वायंगणीत विकास संस्थेवर शिवसेना पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व 

मालवण

वायंगणी विकास संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष उदय दुखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पॅनेलचे सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडविला.

भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी वायंगणी विकास संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. मात्र शिवसेनेच्या उदय दुखंडे यांच्या पॅनेलने भाजपच्या पॅनेलला धोबीपछाड देत सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व राखले.

या निवडणुकीत वैभव जोशी, संतोष कदम यांची बिनविरोध निवड झाली. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून हर्षद पाटील १३३ मते, सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मतदार संघातून सदानंद राणे १३७ मते, अनिल बांदेकर १३४ मते, दशरथ पाटील १३१ मते, अनिल महाजन १३० मते, भगवान सुर्वे १२९ मते, उदय दुखंडे १२८ मते, दिलीप पुजारे १२९ मते, वासुदेव पाटील १२५ मते, महिला प्रतिनिधीमधून अर्चना आंबेकर १३७ मते, स्मिता सावंत १३१ मते मिळवून विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदिनी सामंत- माळगावकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =