You are currently viewing बौद्ध सेवा संघ संस्थेचा रौप्य आणि धर्मांतराचा हिरक महोत्सव निमित्त १० व ११ मे ला वैभव सोहळ्याचे आयोजन…

बौद्ध सेवा संघ संस्थेचा रौप्य आणि धर्मांतराचा हिरक महोत्सव निमित्त १० व ११ मे ला वैभव सोहळ्याचे आयोजन…

वैभववाडी

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ या संस्थेचा रौप्य महोत्सव व धर्मांतराचा हिरक महोत्सवानिमित्त दिनांक १० व ११ मे रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे वैभव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित राहाणार आहेत.

संघटनेला २५ वर्षे होत असल्यामुळे हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.१० मे रोजी सकाळी ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात येणार आहे.सकाळी १०.३० वा.मोफत वैदयकीय शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबीरात डाॕ.रवींद्र जाधव, डाॕ.सुरेखा जाधव,डाॕ.शरद अरुळेकर व अन्य डाॕक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.सकाळी ११ वा.वैभव युवाज हा मनोरंजन खेळ आणि प्रबोधन गटचर्चा, दुपारी २ वा.स्नेहभोजन. दुपारी ३.३० भव्य मिरवणूक , राञौ शाहीर सीमा पाटील यांचा शाहीरी जलसा हा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक ११ मे रोजी सकाळी ११ वा.आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई अध्यक्ष यशवंत यादव हे आहेत. तर तहसिलदार रामदास झळके , पोलिस निरीक्षक अतुल जाधव, मुख्याधिकारी सुरज कांबळे , भिकाजी वर्देकर, ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे आदी उपस्थित राहाणार आहेत.दुपारी ३ कवयीञी कल्पना लिमये यांचे व्याख्यान होणार आहे.तर राञौ वैभव अविष्कार हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा.असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा