You are currently viewing गंगामाई गर्ल्स हायस्कूलची अल्पिता शेखची किशोर गट कबड्डी स्पर्धेसाठी निवड

गंगामाई गर्ल्स हायस्कूलची अल्पिता शेखची किशोर गट कबड्डी स्पर्धेसाठी निवड

जिल्हा संघातील निवडीने तिचे सर्वस्तरातून अभिनंदन

इचलकरंजी

परभणी येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमार्फत दिनांक 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत 14 वर्षाखालील किशोर गटात कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.या स्पर्धेसाठी इचलकरंजी शहरातील
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कु. अल्पिता शेख हिची कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे.या निवडीबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची आठवीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी अल्पिता शेख हिला अगदी
लहानपणापासूनच कबड्डी खेळाची आवड आहे.त्यामुळे तिला वेळोवेळी पालकांचे प्रोत्साहन व हायस्कूलच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत राहिले आहे. सततचा सराव आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिने कबड्डी खेळात चांगले कौशल्य आत्मसात केले आहे.याचेच फलित म्हणजे परभणी येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमार्फत दिनांक 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या 14 वर्षाखालील किशोर गटात कबड्डी स्पर्धेसाठी तिची कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली आहे.या निवडीबद्दल अल्पिता शेख हिचे
श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा शेठजी, चेअरमन हरीष बोहरा , व्हाईस चेअरमन उदय लोखंडे ,ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी बाबासाहेब वडींगे ,स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन तिचा सत्कार केला.
तसेच तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर , उपप्राचार्य आर.एस.पाटील , उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे व पर्यवेक्षक व्ही. एन कांबळे यांनी देखील
अल्पिताचे अभिनंदन केले.या यशासाठी तिला
क्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + nine =