You are currently viewing कोथळीचे सुभाष इंगळे जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

कोथळीचे सुभाष इंगळे जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

*इचलकरंजी अविष्कार सोशल फौंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास मान्यवरांची प्रमुख उपस्थिती*

 

इचलकरंजी येथे आविष्कार सोशल फौंडेशनच्या वतीने कोथळीचे सुपूत्र व निर्भिड पत्रकार सुभाष इंगळे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार वितरण समारंभ
कोल्हापूर मेटँलिक्स चेअरमन उद्योजक संजय भगत यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन कुराडे ,अँडव्होकेट सुदर्शना पवार ,आविष्कार सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आविष्कार सोशल व एज्युकेशन फौंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.विशेष म्हणजे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात येतो.

यंदाच्या वर्षीही या संस्थेच्या वतीने इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात
सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक ,साहित्य, कला – सांस्कृतिक ,उद्योग ,क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना कोल्हापूर मेटँलिक्स चेअरमन उद्योजक संजय भगत यांच्या हस्ते व
ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन कुराडे ,अँडव्होकेट सुदर्शना पवार ,आविष्कार सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत
जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये कोथळीचे सुपुत्र व निर्भिड पत्रकार सुभाष इंगळे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार सुभाष इंगळे यांनी
अगदी वर्तमानपत्र विक्रेते म्हणून निष्ठेने काम करतानाच निर्भिड पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेस न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या कार्याची दखल घेवूनच आविष्कार सोशल व एज्युकेशनल फौंडेशनने त्यांची जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार कार्यगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.या पुरस्काराने निरपेक्ष व्रतस्थ समाजकार्याचा यथोचित गौरव झाल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमास आविष्कार सोशल व एज्युकेशनल फौंडेशनचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी, राज्य सचिव सौ.शैला कांबरे ,फौंडेशनच्या
राज्य संघटक सौ. सुचेता कलाजे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सौ. जयश्री पाटील ,उद्योजक राहुल कर्णे ,मकबुल सय्यद ,ज्ञानेश्वर नारायणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ,फौंडेशनचे पदाधिकारी ,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल पत्रकार सुभाष इंगळे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 2 =