You are currently viewing इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संजय कुडाळकर ; उपाध्यक्षपदी शरद सुखटणकर

इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संजय कुडाळकर ; उपाध्यक्षपदी शरद सुखटणकर

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

पत्रकारांना संघटीत करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संजय कुडाळकर यांची तर उपाध्यक्षपदी शरद सुखटणकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष सुनिल मनोळे यांच्या अध्यक्षतेखाली जुनी नगरपालिका इमारतीतील पत्रकार कक्षामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सदर निवडी जाहीर करण्यात आल्या.

पत्रकारांनी संघटीत होवून स्थापन केलेल्या इचलकरंजी प्रेस क्लब या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकार दिन साजरा करण्याबरोबरच विविध क्षेत्रातील तज्ञांचे व्याख्यान यासह सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या संघटनेची नव्या वर्षीची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. संघटनेचे माजी अध्यक्ष सुनील मनोळे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत इचलकरंजी प्रेस क्लबच्या
अध्यक्षपदी संजय कुडाळकर, उपाध्यक्षपदी शरद सुखटणकर, सचिवपदी राजेंद्र होळकर तसेच खजिनदारपदी अरुण काशिद यांची एकमताने
निवड करण्यात आली. यानंतर नूतन पदाधिका-यांचा सत्कार सुनिल मनोळे, दयानंद लिपारे, संजय खूळ यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आगामी पत्रकार दिन कार्यक्रम
चांगल्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार संजय खूळ, दयानंद लिपारे, अजय काकडे, अरुण वडेकर, मयूर चिंदे, बाळासाहेब पाटील, पद्माकर खुरपे, कृष्णात लिपारे, अरुण काशीद, सागर बाणदार, शैलेंद्र चव्हाण, संतोष काटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा