You are currently viewing मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :

सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुस-या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे,’ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्धाटन केले. या उद्धाटनावेळी भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ‘रस्ते सुरक्षा हा सप्ताह, महिना यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी. नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे. मुलं सज्ञान झाली तर पालक ही सज्ञान होतील,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये १२ ते १३ वर्षाच्या मुलांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केले आहेत. त्याचे मुख्यमंर्त्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अपघात कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा  सत्कार करण्यात आला. यात मुंबई, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =