You are currently viewing खानोली पोटनिवडणुकीत रघुनाथ खानोलकर, दाभोलीत एकनाथ राऊळ

खानोली पोटनिवडणुकीत रघुनाथ खानोलकर, दाभोलीत एकनाथ राऊळ

वेंगुर्लेतील निकाल जाहीर; उभादांडा येथे गणपत सावंतांचा विजय…

वेंगुर्ले

तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उभादांडा येथे गणपत सावंत यांनी २६४ मते, खानोली रघुनाथ खानोलकर यांनी ९९ मते व दाभोली येथे एकनाथ राऊळ यांनी १७९ मते प्राप्त करून विजय मिळविला आहे.तालुक्यातील या तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी साठी काल एकूण ४६ टक्के मतदान झाले होते.आज दुपारी तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली.

उभादांडा येथे दोन मतदान केंद्रावर मिळून १३३१ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ३४.९३ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यापिकी सावंत यांना २६४ तर कमलाकर पांडूरंग कुबल यांना १९६ मते मिळाली. याठिकाणी नोटा ५ मते होती. येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय चव्हाण यांनी काम पाहिले.खानोली येथे २४२ मतदारांपैकी १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ६८.५९ टक्के मतदान झाले होते. खानोलकर यांना ९९ मते तर रुपाली किरण प्रभूखानोलकर यांना ६६ मते मिळाली. एक मत नोटा होते.येथे निवडणूक अधिकारी म्हणून प्रितम पवार यांनी काम पाहिले.

दाभोलीत ५०० मतदारांपैकी ३२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ६५ टक्के मतदान झाले. यातील राऊळ यांना १७९ तर राजाराम यशवंत कांबळी यांना १४२ मते मिळाली. ४ मते नोटा ठरली. येथे निवडणूक अधिकारी म्हणून विजय घोंगे यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nine =