You are currently viewing माजी नगराध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर अभिष्टचिंतन

माजी नगराध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर अभिष्टचिंतन

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रथितयश वकील श्री.दिलीप नार्वेकर यांचा आज वाढदिवस. काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक कार्यकर्ते नेते, नगरसेवक, नगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष असा राजकीय प्रवास करत दिलीप नार्वेकर यांनी आपली राजकीय कारकीर्द घडविली. सावंतवाडीच्या विकासासाठी नगराध्यक्ष असताना त्यांना विशेष प्रयत्न केले होते. क्रिमिनल केसेस मध्ये संपूर्ण जिल्ह्यात ॲड. दिलीप नार्वेकर हे नाव आदराने घेतले जाते. वकिली क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे, अनेक ज्युनियर वकील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत. बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे एक हुशार वकील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
सावंतवाडीच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा त्यांनी गेली अनेक वर्षे अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलेली आहे. सदैव हसतमुख आणि सावंतवाडीच्या घराघरातील आपलेसे वाटणारे, मित्रपरिवारास समरस होऊन जगणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे वकील श्री दिलीप नार्वेकर….! अशा या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या संवाद मिडियाकडून आभाळभर शुभेच्छा….!

प्रतिक्रिया व्यक्त करा