You are currently viewing आम्ही बालकवी सिंधुदुर्ग संस्था आयोजित दुसरे जिल्हास्तरीय खुले कवी संमेलन वेंगुर्ला येथे होणार

आम्ही बालकवी सिंधुदुर्ग संस्था आयोजित दुसरे जिल्हास्तरीय खुले कवी संमेलन वेंगुर्ला येथे होणार

रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी आयोजन

आम्ही बालकवी संस्था सिंधुदुर्ग या रजिस्टर असलेल्या संस्थेचे दुसरे जिल्हास्तरीय खुले कवी संमेलन येत्या रविवारी दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी वेंगुर्ला येथे होणार आहे. स्वच्छ सुंदर शहर म्हणून नावारूपास आलेल्या वेंगुर्ला नगरीत नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील स्वामी विवेकानंद सभागृहात शिक्षिका तथा कवयित्री सौ.देवयानी आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली रंगणाऱ्या कवी संमेलनात बालकवी संस्थेच्या सर्व कवी कवयित्रींना आपले काव्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. नवोदित साहित्यिकांना आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालकवी संस्था नेहमीच कार्यरत असते. संस्थेचे संस्थापक कवी श्री राजेंद्र गोसावी यांच्या प्रयत्नांतून उभी राहिलेली ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली असून सर्वानाच चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे अलौकिक कार्य करत आहे.
वेंगुर्ला नगरीत रंगणाऱ्या कवी संमेलनास सर्व कवी, कवयित्री, साहित्यिक व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री राजेंद्र गोसावी या आयोजक कवयित्री सौ.प्राजक्ता आपटे यांनी केलं आहे.

*स्थळ —–वेळ*
स्वामी विवेकानंद सभागृह,
वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासकीय इमारत, वेंगुर्ला.

रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + seven =