You are currently viewing कुडाळात १३ केंद्रांवर उद्या मतदान..

कुडाळात १३ केंद्रांवर उद्या मतदान..

१३ जागांसाठी ४१ रिंगणात..

सिंधुदुर्ग

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम रविवारी रात्री १० वाजता समाप्त झाली. सोमवार २० प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी यांवर भर दिला जाणार आहे .शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी भाजपा राष्ट्रीय काँग्रेस, मनसे व राजकीय पक्षांसह अपक्षांनी शहरात घर टू घर प्रचार मोहीम राबवली आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा पार पडल्या आहेत.

या नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी मंगळवारी २१ डिसेंबरला १३ केंद्रांवर मतदान होत आहे. १३ जागांसाठी एकूण ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण १२ हजार ४४० कुडाळ नगरपंचायतीचे भवितव्य ठरवणार आहेत. दरम्यान निवडणुकीत प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहे. कुडाळ नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर कुडाळ नगर पंचायतीची ही दुसरी निवडणूक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा