You are currently viewing वैभववाडीत भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन : प्रचार रॅलीत घोषणांनी शहर दणाणले

वैभववाडीत भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन : प्रचार रॅलीत घोषणांनी शहर दणाणले

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत आज भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरात प्रचार रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वंदे मातरम… भारत माता की.. जय, नितेश राणे आगे बढो… अशा घोषणांनी भाजपा कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले.
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 21 रोजी होत आहे. सर्वच पक्षाने या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडविला. ओबीसीच्या जागा सोडून उर्वरित 13 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपाने सर्व जागांवर आपले तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग निहाय प्रचार रॅली गेली काही दिवस सुरू आहे.
रविवारी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बाजारपेठेतील रिक्षाचालक, व्यापारी, फुल विक्रेते, मच्छी विक्रेते यांनी आ. नितेश राणे यांच्याशी संवाद साधला.
या रॅलीत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजपा निवडणूक प्रभारी संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, माजी सभापती दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, शारदा कांबळे, मिलिंद मेस्त्री व मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत शहरातील मतदार व नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा