You are currently viewing देवगड नगरपंचायत निवडणुकीत सौ.प्रियांका तारी यांची अपक्ष उमेदवारी

देवगड नगरपंचायत निवडणुकीत सौ.प्रियांका तारी यांची अपक्ष उमेदवारी

देवगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून देवगड मध्ये देखील चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी वरून वादंग उभे राहताना दिसत असून पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून नवख्याना संधी दिल्याचे चित्र उभे राहिल्याने कट्टर शिवसैनिक असलेल्या देवगड तारामुंबरी येथील सौ. प्रियांका तारी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
तारामुंबरी येथून गेली 26 वर्षे सातत्याने पक्षाचे काम करणाऱ्या पक्ष संघटक असलेल्या प्रियांका तारी यांनी उमेदवारी मागितली होती व पक्षाचा अर्ज देखील भरला होता. परंतु वरिष्ठांनी प्रियांका तारी यांना उमेदवारी न देता सहानुभूती म्हणून साक्षी प्रभू यांनी उमेदवारी दिल्याचे सांगत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहत ज्या पक्षात उभी हयात घालवली त्यानेच अन्याय केल्याने लोकांचे रस्ता, पाणी आदी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी सौ. प्रियांका तारी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून भविष्यात निवडून आल्यास अपक्ष म्हणून कार्यरत राहणार असल्याचे सूतोवाच केले आहेत.
तारामुंबरी येथे जाणारा रस्ता हा गेली अनेकवर्षं खड्डेमय आहे, मागील पाच वर्षात भाजपची सत्ता होती परंतु त्यांनीही तेथील लोकांचा अपेक्षाभंगच केला. देवगड नळपाणी योजना हा प्रश्न तर प्रत्येक सत्ताधारी आपण सोडवणार असे सांगत निवडून येतो परंतु १८ कोटींची असलेली नळपाणी योजना आज ५४ कोटींवर गेली तरीही त्याबद्दल कोणालाही सोयरसुतक नसल्याने सौ.प्रियांका तारी या तारामुंबरी येथून अपक्ष लढत देत असून आपण लोकांच्या पाठिंब्यावर नक्कीच निवडून येणार अशी त्यांना खात्री आहे. लक्ष्मण तारी हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक… अन्यायाविरुद्ध लढायचे अशी बाळासाहेबांची शिकवण घेऊनच त्यांनी आपल्या पत्नीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार दाखल करून लढण्याची जोरदार तयारी ठेवली. लक्ष्मण तरी हे पर्यावरण प्रेमी आहेत, जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व हे नारायण राणें यांनी सेना सोडल्यावर जवळपास संपुष्टात आले होते. निवडक कार्यकर्ते घेऊन परशुराम उपरकर सेनेला उभारी आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु शिवसेनेच्या गोटात वैभव नाईक दाखल झाल्यावर सेनेला जिवंतपणा आला आणि सेनेला वर्चस्व प्रस्थापित करून दिले ते दीपक केसरकर यांच्या नेतृत्वामुळे!

प्रतिक्रिया व्यक्त करा