You are currently viewing दोडामार्ग शहराची सत्ता द्या, दोडामार्गचा स्वप्नवत विकास करू – सौ. अर्चना घारे – परब

दोडामार्ग शहराची सत्ता द्या, दोडामार्गचा स्वप्नवत विकास करू – सौ. अर्चना घारे – परब

कसई-दोडामार्ग नगरपंचायतवर फडकणार राष्ट्रवादी शिवसेनेचा झेंडा

दोडामार्ग

नगरपंचयात मध्ये अपुरी राहिलेली कामे पूर्ण करून कसई दोडामार्ग शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसली असून त्यासाठी सेना राष्ट्रवादी पक्षाच्या हातात कसई दोडामार्ग शहराची सत्ता द्या, दोडामार्गचा स्वप्नवत विकास करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे परब यांनी दोडामार्ग येथे दिली.

त्यांनी आज दोडामार्ग पक्ष कार्यालयात नगरपंचायत उमेदवारांसह पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार हे स्वच्छ चारित्र्य तसेच शिक्षित असून आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष याचा शिवसेना राष्ट्रवादी आघाडीत फॉर्म्युला ठरलेला नसून या निवडणूक विजयानंतर तो ठरविला जाईल असेही सौ अर्चना घारे म्हणाल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, संदीप घारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रोहिणी राणे, शहराध्यक्ष सुदेश तुळस्कर, उमेदवार व जिल्हाउपाध्यक्ष संदीप गवस, रामचंद्र ठाकूर, विजय मोहिते, अपर्णा देसाई, शुभांगी खडपकर, संगीता बोडेकर, तेजस्विता जाधव यासह अभिजित देसाई, श्री खडपकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा