You are currently viewing कोरोना व्हायरस मुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यवसायिकांना शासनाच्या भरीव आर्थिक मदतिची व पॉलिसी ची गरज

कोरोना व्हायरस मुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यवसायिकांना शासनाच्या भरीव आर्थिक मदतिची व पॉलिसी ची गरज

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लक्ष द्यावे

-श्री बाबा मोंडकर. अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ

गेले दीड वर्षात कोरोना व्हायरस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार,व्यापारी, मच्छीमार, पर्यटन व्यवसायीक उध्वस्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सागरी पर्यटनासाठी दरवर्षी १५ लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात.यावर येथील होम् स्टे, लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल, जलक्रिडा,वाहन धारक व्यवसायिकांचा व्यवसाय चालतो.परंतु कोरोना व्हायरस मुळे या भागातील व्यवसाय बंद असल्याने व्यवसाय देखभाल , कामगार पगार ,शासकीय कर, पाणी बिल,लाईट बिल,वाहन कर्ज ,ग्रुह व व्यवसाय कर्ज भरणार कुठून हा यक्ष प्रश्न पर्यटन व्यावसायिकां समोर उभा आहे.

देशातील व राज्यातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकार ने १९९७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली तरी ज्या प्रमाणे घाटमाथ्यावर दूधसंघ,सूतगिरण,साखर कारखाने उभारणीसाठी हजारो कोटी रुपए खर्च केले गेले व आजही अविरत मदत चालू आहे त्यांच्या १% ही मदत जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना आजपर्यंत झाली नाही.आज स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी स्वकर्तुत्वातुन जिल्ह्यातील पर्यटनशेत्राचे नाव देशविदेशात पोचविले आहे.

कोरोना व्हायरस ची जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढ होण्यास सुरवात झाली असून पर्यटन व्यावसायिकांचे पुढील आर्थिक नियोजन होणार कुठून हा प्रश्न उभा असून या कठीण प्रसंगात राज्यसरकडून विशेषतः मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडून स्थानिक पर्यटन व्यावसायिकाना मदतीची अपेक्षा असून पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या कामगार हॉटेल देखभाल खर्चासाठी सानूग्रह आर्थिक अनुदान देण्यात यावे. लाईट बिल, शासकीय कर, बँक कर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यात यावी.सर्व प्रकारची कर्ज पुर्गठित करून गेल्या दोन आर्थिक वर्षातील कर्जावरील व्याज मायबाप सरकारने अनुदान स्वरूपात पर्यटन व्यावसायिकांस माफ करावे आणि व्यावसायिकांच्या कर्जाच्या २०% रक्कम येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय उभारण्यासाठी देण्याचे आदेश जिल्ह्यातील बँक ,वित्तीय संस्था यांना देण्याचे आदेश राज्यसरकारने द्यावे. गेले दीड वर्ष व्यवसाय बंद राहिल्याने कमर्शियल लाईट बिलातून सूट मिळून वापरलेल्या लाईट युनिट चा कमी कमी दर आकारण्यात यावा तसेच स्थिर आकार व अन्य करा मध्ये सरकारने सूट द्यावी. मिळावी.

पर्यटन व्यवसाय वाढीसाठी राज्यसरकारने पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्वतंत्र पर्यटन पॉलिसी स्थानिक जिल्ह्यातील व्यावसायिकांना विश्वासात घेऊन बनविण्यात यावी ज्या मध्ये शासकीय कर,जि एस टी करामध्ये सूट द्यावी. बँक कर्ज व व्याजावर अनुदान देण्यात यावे जिल्ह्यातील लाईट, रस्ते, पाणी, इंटरनेट सुविधा. तसेच जिल्ह्यातील बीच, हिस्ट्री,कल्चर, जंगल सफारी, क्रुषि पर्यटन, जलक्रिडा ,मेडिकल टुरिझम साठी ,खाद्यसंस्कृती साठी स्वतंत्र पर्यटन जिल्ह्याची पॉलिसी विशेष पॉलिसी राबविण्यात यावी.व्हर्च्युअल मीटिंग द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी देश विदेशातील टूरआयोजकांनां जिल्ह्यात पर्यटक आणण्यासाठी प्रचार प्रसार करण्यात यावा. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती द्यावी तसेच या भागात पर्यटक वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्हा एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने राज्य सरकारने या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यासाठी सिंधुदुर्ग टुरिझम झोन निर्माण करून प्रसिध्दी द्यावी चिपी विमानतळ व सी वल्ड प्रकल्प,जलवाहतूक, सीपेल्न सारखे प्रलंबित प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात याव्यात.तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी सरकारच्या पर्यटन महामंडळ व स्थानिक पर्यटन व्यवसायीकांची त्वरित कमिटी गठित करून पर्यटन वाढीचे नियोजन करण्यात यावे अशी विनंती श्री. बाबा मोंडकर अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाला तर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 4 =