You are currently viewing कणकवलीत बस स्थानकासमोर मॅजिक स्टॅन्डचा शुभारंभ

कणकवलीत बस स्थानकासमोर मॅजिक स्टॅन्डचा शुभारंभ

कणकवली

कणकवली बसस्थानकासमोर सहा आसनी मॅजिक स्टॅन्ड चा शुभारंभ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली – नाटळ, दिगवळे, बोर्डवे, आब्रड या भागात जाणाऱ्या प्रवाशांकरिता बसस्थानकासमोरील हे सहा आसनी मॅजिक स्टँड फायदेशीर ठरणार आहे. या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक धारकांकडून स्टॅन्ड साठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.

नगराध्यक्ष समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्या माध्यमातून या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी मॅजिक धारकांना एकाच छताखाली जागा देण्यात आली.यावेळी महापुरुष मॅजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण नगराध्यक्ष समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मॅजिक – चालक मालक उपस्थित होते. तसेच भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, सुशील पारकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा