You are currently viewing श्री देवी भराडी मातेचा २४ फेब्रुवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव

श्री देवी भराडी मातेचा २४ फेब्रुवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव

मालवण :

 

नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (ता. मालवण) येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली आहे. भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. देवीने कौल दिल्यानंतर गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तारीख निश्चित करण्यात आली आहे. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल, एवढं निश्चित! ओमीक्रोनच्या संकटाची टांगती तलवार श्री देवी भराडी मातेच्या कृपेने दूर होऊन यावर्षीची यात्रा पूर्वीप्रमाणे भरेल असा विश्वास मात्र श्री देवी भराडी मातेच्या भक्तांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 2 =