You are currently viewing वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम…

वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम…

बांदा

कला अकादमी मुंबई आयोजित बाल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळा नंबर १ चा इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर यांने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या यशात त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर, बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, तसेच मुख्याध्यापिका सौ सरोज नाईक, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील आणि वर्गशिक्षिका प्राजक्ता पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. नीलने यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. नुकत्याच कोल्हापूर संस्थान आयोजित कथाकथन स्पर्धेतही तो राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा