You are currently viewing अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा-काजू पिकांच्या नुकसानीची भरपाई देणे बाबत तहसीलदारांना निवेदन सादर

अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा-काजू पिकांच्या नुकसानीची भरपाई देणे बाबत तहसीलदारांना निवेदन सादर

वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चाची मागणी

वेंगुर्ले

नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजु मोहरावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी व बागायतदारांनी बॅंक कर्ज उचल करुन औषधे, कीटकनाशके खरेदी केली. अवकाळी पावसाळ्यापुर्वी आंबा – काजु कलमावर मोठ्या प्रमाणात फवारणी झाली होती, परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा व बागायतदारांचा हा खर्च वाया गेला असुन आर्थिक नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे आलेला मोहर खराब झाला असुन त्याचा परिणाम आंबा – काजु उत्पादनांवर होणार आहे. शेतकरी – बागायतदारांनी स्वतः चा घातलेला पैसा, बॅंक कर्जाद्वारे उभारलेला पैसा याद्वारे आर्थिक नुकसान होणार आहे. शासकीय यंत्रणेमार्फत या नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्यात यावे. जेणेकरून शेतकरयांना शासकीय मदत, पिक विमा संरक्षणाचा लाभ मिळवता येईल तरी या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करुन तात्काळ कार्यवाही व्हावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. तसेच शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास व शेतकरी – बागायतदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्यास भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा तहसीलदार यांना देण्यात आला.
यावेळी किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, महीला मोर्चा च्या सारीका काळसेकर, किसान मोर्चा ता .सरचिटणीस सत्यवान पालव, आंबा बागायतदार प्रताप गावसकर, संजय वेंगुर्लेकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, माजी पं.स.सदस्य पुरुषोत्तम परब, रविंद्र शिरसाठ, शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, वृंदा गवंडळकर, रसीका मठकर, युवा मोर्चा चे हेमंत गावडे, प्रमोद शिरोडकर, रमेश परब, चंद्रकांत परब, गोविंद परब, सूर्यकांत परब इत्यादी आंबा – काजु बागायतदार व किसान मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा