You are currently viewing राजन चिके वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजन चिके वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडाघाट

श्री.राजन चिकेंच्या वाढदिवसाच्या पुर्व संध्येला मित्रमंडळाच्या वतीने घेतलेल्या महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिरासाठी तीनशे रुग्णांची नोंद झाली. सभापती मनोज राणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती सौ.राणे[हळदिवे], सरपंच आग्रे, वालावलकर ट्रस्टचे (डेरवण) सर्व अग्रगण्य डाॅक्टर यांनी दिप प्रज्वलन करुन शुभेच्छा दिल्या.

श्री.राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज आरोग्य शिबीर आणि उद्या राजन चिके यांचा वाढदिवस आणि शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे.भा.ज.प तालुकाध्यक्षांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उपसभापती प्रकाश पारकर यांनी नारळ वाढवुन कार्यक्रमाचे उद्धाटन झालेचे जाहीर केले.

उद्या संध्याकाळी ६ वाजता वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमदार नितेश राणे आणि जिल्ह्यातील सर्व नेते आणि राजन चिके प्रेमी उपस्थित राहाणार आहेत.अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा देवुन हा कार्यक्रम यशस्वी करणा-या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

सर्व लोकांच्या आग्रवास्तव आणखी २०० माणसांची तपासणी श्री.राजन चिके यांनी करावयास लावली. एकुण ४९० लोकांची तपासणी करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा