You are currently viewing विशेष पुरस्कार व एअर मार्शल व्ही. ए. पाटकर पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ….

विशेष पुरस्कार व एअर मार्शल व्ही. ए. पाटकर पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ….

सिंधुदुर्गनगरी : 

माजी सैनिक, पत्नी व पाल्य यांना विशेष पुरस्कार देवून गौरविण्याबाबत आणि माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना 10 वी, 12 वी या इयत्तेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर पुरस्कार देण्याबाबत दि. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. तथापि कोविड-19 मुळे शाळा, कॉलेज बंद असल्याकारणामुळे पाल्यांना गुणपत्रक, बोनाफाईड आदी कागदपत्रे मिळणे शक्य होत नसल्याने, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या तारीखेला दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी माजी सैनिक, पत्नी, पाल्य व विधवांच्या पाल्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 11 =