You are currently viewing आ. नितेश राणे यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची सावंतवाडीतील निवासस्थानी सदिच्छा भेट

आ. नितेश राणे यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची सावंतवाडीतील निवासस्थानी सदिच्छा भेट

कोकणच्या विकासासंदर्भात विस्तृत चर्चा

सावंतवाडी

कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सावंतवाडी येथील ‘सरस्वती’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ॲड. राहुल नार्वेकर व आ. नितेश राणे यांच्यात कोकणच्या विकासासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.

कोकणच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार असा शब्द विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर यांनी आ. नितेश राणे यांना दिला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − three =