You are currently viewing शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीच्या वतीने १३ डिसेंबरला नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीच्या वतीने १३ डिसेंबरला नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

वेंगुर्ले

राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांत सर्वात महत्वाचा कार्यक्रम रविवार 13 डिसेंबर रोजी वेंगुर्ले शहरातील दाभोलीनाका येथील डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ले यांच्या सहकार्याने वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे मोफत नेत्र तपासणी व गरजू आणि गरीब नेत्ररूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन सर्वानुमते करण्यांत आले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात वेंगुर्ले राष्ट्रवादीची खास सभा शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या अध्यक्षतेखाली हॉस्पीटल नाका वेंगुर्ले येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात संपन्न झाली. या सभेस राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल, जिल्हा बॅक संचालिका प्रज्ञा परब, जिल्हा चिटणीस मकरंद परब, तालुका महिला अध्यक्ष दिपिका राणे, शहर उपाध्यक्ष अमित म्हापणकर, शहर सचिव डॉ. स्वप्नील रावळ, महिला शहर अध्यक्ष सुप्रिया परब,कार्यकारिणी सदस्य बावतीस डिसोजा, सचिन शेटये , शिवाजी गावडे यांचा समावेश होता.

यावेळी पदाधिकाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर शनिवार दि. 11 रोजी सकाळी 10.10 वाजता सातेरी देऊळवाडा येथील शाळा नं. 4 मधील सर्व मुलांना खाऊ वाटप, दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10.10 वाजता शहर कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस व मान्यवरांचा सत्कार, दि, 13 रोजी सकाळी 10.10 ते दुपारी 12.30 वाजेपर्यत शहरातील दाभोलीनाका येथील गद्रे नेत्र रुग्णालयात गरिब व गरजूंन साठी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर असे कार्यक्रम निश्चीत करण्यांत आले. वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित सर्व कार्यक्रम हे शासनाचे कोव्हीडचे नियम पाळूनच केले जाणार आहेत. या शिबिराचा लाभ वेंगुर्ले शहरातील गरीब व गरजू नेत्ररूग्णांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा