You are currently viewing तळेरेतील दळवी महाविद्यालयात क्रीडासंकुल उभारणार

तळेरेतील दळवी महाविद्यालयात क्रीडासंकुल उभारणार

 कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर

दळवी महाविद्यालयात ‘विश्वविजयोत्सव’ 2020 ऑनलाईन क्रीडा महोत्सव संपन्न

तळेरे

तळेरेतील दळवी महाविद्यालयात ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध खेळांचा सराव करण्यासाठी अत्याधुनिक क्रीडासंकुल उभारण्यासाठी आपण खास बाब म्हणून प्रयत्न करणार असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व होमी भाभा राज्य विद्यापीठाचे, प्रभारी कुलगुरू, प्रा. सुहास पेडणेकर यांनी तळेरेतील ‘विश्वविजयोत्सव’ निमित्ताने जिल्हास्तरीय योगा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले की,तळेरेतील दळवी महाविद्यालयाने आपले वेगळेपण जोपासत सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, याबद्दल श्री.विनायक दळवी सरांचे व महाविद्यालयाचे अभिनंदन करत,त्यांनीं उच्च व तंत्रशिक्षण शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे नेहमीच सहकार्य नेहमीच लाभते असल्याचेही आवर्जून सांगितले.

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गात

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने लवकरच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्ग येथे सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.असे सांगून याचा आढावा घेण्यासाठी लवकरच आपण सिंधुदुर्गात येणार आहोत” अशी माहिती याप्रसंगी कुलगुरू पेडणेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिली.

तळेरे येथील दळवी महाविद्यालयात
‘विश्वविजयोत्सव सन २०२०’ या निमित्ताने
जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन योगा स्पर्धेचे आॅनलाईन आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर अध्यक्षस्थानी होते तर, प्रमुख उपस्थिती मानद मार्ग निर्देशक प्रा. विनायक दळवी व प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक तथा ज्युदो कराटेचे जिल्हा मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड हे उपस्थित होते.

याप्रसंगी तळेरेतील दळवी महाविद्यालयात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला दत्तात्रय मारकड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून या शानदार विश्वविजोत्सवा अंतर्गत जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे उद्घाटन झाले.याप्रसंगी प्रा. हेमंत महाडिक ,प्रा.शेखर दळवी, अन्य प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
देशी खेळांना सातासमुद्रापार नेण्याचा मानस व भारतामध्येसुद्धा या खेळाची लोकप्रियता वाढावी यासाठी ‘बी इंडियन प्ले इंडियन, अशी एक नावीन्यपूर्ण संकल्पना क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयाचे मानद मार्ग निर्देशक प्रा. विनायक दळवी यांनी उदयास आणली. गतवर्षी कबड्डी या खेळास चालना देण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते, तर यावर्षी जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘योगा स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजकांकडून सांगण्यात आली.

कोरोनाच्या महामारीतही मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सुरळीत:
प्रा.विनायक दळवी

कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे, नव सहाय्यक प्राध्यापकांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर करतांना, प्रा. विनायक दळवी म्हणाले की, ” कुलगुरू सरांचे अभिनंदन करतो की, कोरोनाच्या या जागतिक महामारीत सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सुरळीत झाल्या ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. कोकणातील दोन्ही महाविद्यालयास कुलगुरूंचे नेहमी सहकार्य लाभते” असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ,क्रीडाशिक्षक व पत्रकार, दत्तात्रय मारकड म्हणाले की, “सर्व विद्यार्थ्यांचा आवडता तास हा खेळाचा तास असतो, प्रत्येकाच्या जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्त्व असून विद्यार्थ्यांने आनंद मिळवण्यासाठी खेळ खेळला हवा, ग्रामिण भागातीलही आपला खेळाडू ऑलम्पिक मध्ये गेला पाहिजे असा आशावाद क्रीडाशिक्षकांना वाटत असतो, त्यापध्दतीने ते स्वत:चे योगदान ते देत असतात,देशाची एक सशक्त पिढी ही खेळातून निर्माण होते” असे गौरवोद्गार काढुन विश्वविजयोत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या आॅनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर दळवी यांनी तर आभार प्रा. हेमंत महाडिक यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

 

तळेरे: मुंबई विद्यापीठांतर्गत दळवी महाविद्यालयातील ‘विश्वविजयोत्सव निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे दिपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना व मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे तथा जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + one =