You are currently viewing गजानन नाईक यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल : अच्युत सावंत भोंसले

गजानन नाईक यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल : अच्युत सावंत भोंसले

सिंधुदुर्ग डिजीटल मिडीया सेलच्या माध्यमातून नाईक यांचा सत्कार

सावंतवाडी

महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारिता अधिस्वीकृती समितीच्या कोल्हापूर विभागीय सदस्यपदी जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची निवड झाल्याने त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना एक आश्वासक चेहरा प्राप्त झाला आहे. त्यामुळे रखडलेला अधिस्विकृतीचा प्रश्न त्यांच्याकडुन नक्कीच मार्गी लावला जाईल, असा विश्वास भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांनी केले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही कायम सकारात्मक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. हाच वारसा नवोदीत पत्रकारांनी पुढे चालू ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या अधिस्वीकृती कोल्हापूर विभागीय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचा सिंधुदुर्ग डिजीटल मिडीया सेलच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पत्रकार सघांचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, डिजीटल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंंबकर, सचिव रोहन नाईक, कार्याध्यक्ष विजय गावकर, उपाध्यक्ष हेमंत मराठे सावंतवाडी पोलिस निरिक्षक ऋषीकेश अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब तहसीलदार संदिप चव्हाण, श्रीराम बोअरवेल्सचे संचालक अजित पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी अच्युत भोसले म्हणाले, गजानन नाईक यांंची पत्रकारातेतील कारकीर्द लक्षात घेता त्यांनी नेहमीच अनेकांना सहकार्य केले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणारा एक सर्वसामान्य पत्रकार म्हणून त्यांची आजही ओळख कायम आहे. आत्ता तर त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. त्याचा फायदा घेवून त्यांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील, असा आम्हाला विश्वास आहे.
सत्काराला उत्तर देताना गजानन नाईक म्हणाले, या ठिकाणी डिजीटल मिडीया सेलच्या माध्यमातून करण्यात आलेला सत्कार मला प्रेरणा देणारा आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. त्यासाठी जाचक अटी बाजूला ठेवून काही पर्यायी मार्ग काढता येवू शकतो का या दृष्टीने आमचे विचार सुरू आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवर तोसरकर, अधिकारी, सांळुखे आदींनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डिजीटल मिडीयावर निवड झालेल्या रोहन नाईक, विजय गावकर, हेमंत मराठे आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आल.
यावेळी जेष्ठ पत्रकार मोहन जाधव, सचिन रेडकर, साबाजी परब, मंगल कामत, निखिल माळकर, भुवन नाईक, योगिता बेळगावकर, आरती राऊळ, नितेश देसाई, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, शुभम सावंत, हेमंत पागंम, सचिन मोरजकर, माधव वेंगुर्लेकर, निलेश परब, ओंकार घाडी, उमेश काळकुद्रींकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक शुभम धुरी तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा